advertisement

या ट्रिकने कमी होईल तुमचं क्रेडिट कार्डचं व्याज! बँका हे कधीच सांगणार नाहीत

Last Updated:
जास्तीत जास्त लोक विचार करतात की, क्रेडिट कार्डच्या व्याजचा रेट फिक्स्ड आहे आणि बदलला जाऊ शकत नाही. मात्र सत्य असं आहे की, तुमचा रिवॉर्ड चांगला असेल तर यात बदल होऊ शकतात. ते कसं पाहूया...
1/5
नवी दिल्ली : भारतात क्रेडिट कार्डचं व्याज खुप जास्त असतं. हे सरासरी 36% ते 45% वार्षिक (महिन्यात 3-3.75%) पर्यंत असतं. जास्तीत जास्त लोक मानतात की, क्रेडिट कार्डवर लागणारं वार्षिक व्याज हे फिक्स असतं आणि ते बदललं जाऊ शकत नाही. बँकानाही वाटतं की, तुम्हाला हे असंच वाटावं. मात्र सत्य हे आहे की, तुमचा रिवॉर्ड चांगला असेल तर तुम्ही बँकेशि निगोसिएशन करुन व्याजदर कमी करुन घेऊ शकता.

2/5
बँक तुमचे कधी ऐकते? : बँका ग्राहक गमावण्याचा धोका जास्त आहे असे मानतात तेव्हाच त्या मागे हटतात. तुमचा पेमेंट रेकॉर्ड स्वच्छ असेल, तुम्ही त्याच बँकेचे दीर्घकाळ ग्राहक असाल आणि तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तर तुमची स्थिती मजबूत आहे.विशेष म्हणजे, योग्य वेळी केलेली मागणी जास्त प्रभावी ठरते. सतत 6-12 योग्य वेळी पैसे भरल्यानंतर केलेल्या रिक्वेस्टवर बँक जास्त गांभीर्याने विचार करते. मात्र नुकतेच लेट पेमेंट झाले असेल तर मागणी फेटाळली जाते.

3/5
प्रभावी संभाषण कसे करावे : ही तक्रार कॉल नाही तर रिटेन्शन संभाषण आहे. ग्राहक सेवेला रिटेन्शन किंवा रिलेशनशिप टीमशी संपर्क साधण्यास सांगा. तुमचा सध्याचा व्याजदर तुमच्यासाठी खूप जास्त आहे आणि तुम्ही इतर पर्यायांचा विचार करत आहात हे स्पष्टपणे सांगा. तुम्हाला दुसऱ्या बँकेकडून कमी दराची ऑफर मिळाली असेल, तर ते नमूद करणे उपयुक्त ठरू शकते. संभाषणादरम्यान भावनांपेक्षा डेटावर लक्ष केंद्रित करा.

4/5
बँक काय ऑप्शन देऊ शकते : प्रत्येक वेळी बँक स्थायी स्वरुपात व्याजदर कमी करत नाही. अनेकदा काही महिन्यांसाठी कमी दर ऑफर करते किंवा कमी व्याजाचे कार्डमध्ये बदलाचा ऑप्शन देतात. काही प्रकरणांमध्ये उर्वरित करमेला ईएमआयमध्ये बदलणे किंवा बॅलेन्स ट्रान्सफर सारखी सुविधाही दिली जाते. ज्यामुळे एकूमच व्याजाचं ओझं कमी होऊ शकतं

5/5
तुम्हाला
तुम्हाला "नाही" असे उत्तर मिळाले तर काय करावे? : बँकेने स्पष्टपणे नकार दिला तरी, सर्व पर्याय बंद नाहीत. कमी दराच्या कार्डवर बॅलन्स ट्रान्सफर करणे किंवा आवश्यक असल्यास, महागडे कर्ज फेडण्यासाठी पर्सनल लोन घेणे ही देखील एक रणनीती असू शकते. विवेक आणि शिस्तीने, उच्च क्रेडिट कार्ड व्याजदर लक्षणीयरीत्या कमी करता येतो.
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement