'सुनेत्रा पवारांचा पराभव झाला, त्या दिवशी 5 वाजता अजितदादांनी फोन केला', तटकरेंनी बोलता बोलता बरंच सांगितलं
- Published by:Sachin S
Last Updated:
"आज या गोष्टीचा उल्लेख करावा वाटला, राजकीय वाटचाल एका दिवसामध्ये होत नाही. देशपातळीवर तर होत नाही. अजितदादांनी कणखरपणे नेतृत्व केलं.
मुंबई:"लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. अजितदादांसारखा दिलदार नेता, त्यावेळी त्यांनी मला अशा परिस्थितीतही फोन केला, संध्याकाळी एनडीएची बैठक आहे, तुम्हाला आणि प्रफुलभाईंना बैठकीला गेलं पाहिजे. मी त्यांना सांगितलं तुम्हाला भेटल्याशिवाय कुठे जाणार नाही. मी अजितदादांना भेटलो आणि त्यानंतर दिल्लीला गेलो. दिल्लीपेक्षा अजितदादा हे आमच्यासाठी सर्वस्व होते. आधी दादांना भेटलो नंतर पुढे गेलो होतो" असं सांगत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत भावुक झाले. तसंच, सिंचन प्रकल्प प्रकरण आणि राष्ट्रवाादीच्या मंत्र्यांच्या चौकशीचा आदेश दिला होता, त्याचं शल्य अजितदादांना कायम स्वरुपी होतं, असंही तटकरेंनी यावेळी सांगितलं.
मुंबईतील वरळी इथं राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी सुनील तटकरे याांनी आपल्या भाषणात अजितदादांच्या आठवणी जागवल्या.
"रात्रदिवस एक करून जलसंपदा खात्याची श्वेतपत्रिका काढली. खंड एक खंड दोन काढले. राज्यातच सिंचनाचाा इतिहास काढला. चितळे समिती अहवाल सादर केला. मी त्यावेळी लोकसभेची निवडणूक हरलो होतो. राजीनामा देण्याचं मी अजितदादांना बोलून दाखवलं होतं, त्यावेळी एटिआर मांडला गेला. माझ्या मनात एक शल्य राहिलं, सिंचन घोटाळ्याबद्दल अहवाल सादर केला. राज्यात सिंचनाचं प्रमाण टक्का १ पेक्षा जास्त झाला होता, पण वेगळे आरोप होत राहिले. ही खंत कायम राहिली, राज्यात आपलं सरकार होतं, दादा उपमुख्यमंत्री होते, सुनिल तटकरे, छगन भुजबळ आम्ही मंत्री होतो, पण तरीही एसपीची खुली चौकशीचा आदेश दिला गेला, हे शल्य आणि दु:ख अजितदादा कधी विसरले नाही, असं यावेळी तटकरेंनी सांगितलं.
advertisement
आधी अजितदादा मग दिल्ली
लोकसभा निवडणूक पराभव झाल्यानंतर अनेकांनी टीकास्त्र आमच्यावर केली. आता महाराष्ट्रात अजितदादांचं काही चालणार नाही. मी त्यावेळी एक वाक्य बोललो, आता अजित पर्व सुरू होणार आहे, त्यावेळी माझ्यावर अनेकांनी टीका केली. त्या वाक्याचा वेगळा अर्थ कााढला गेला. त्यावेळी सगळ्याांनी साथ दिली. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. अजितदादांसारखा दिलदार नेता, त्यावेळी त्यांनी मला अशा परिस्थितीतही फोन केला, संध्याकाळी एनडीएची बैठक आहे, तुम्हाला आणि प्रफुलभाईंना बैठकीला गेलं पाहिजे. मी त्यांना सांगितलं तुम्हाला भेटल्याशिवाय कुठे जाणार नाही. मी अजितदादांना भेटलो आणि त्यानंतर दिल्लीला गेलो. दिल्लीपेक्षा अजितदादा हे आमच्यासाठी सर्वस्व होते. आधी दादांना भेटलो नंतर पुढे गेलो होतो.
advertisement
अजितदादांनी राजीनामा दिला आणि....
"अनेक घडामोडी होत गेल्या, एखादं नेतृत्व निर्माण होत जातं, ताकद वाढत गेलं, त्यावेळी अजितदादांवर खूप टीका झाली. त्याचा अजितदादांना खूप त्रास झाला. २०१२ पासून दादावर आरोप झाले तर जनता त्यांच्या पाठीशी राहिली. सुनेत्रा पवार यांनी सावली सारखी साथ दिली. त्यामुळे उत्तराधिकारी होण्याचा मान आणि सन्मान हा फक्त तुमचा होता. मला आठवतं २५ सप्टेंबर २०१२ रोजी मी आणि आर आर पाटील हे रायगडमध्ये पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यासाठी जाणार होतो, मला साडेसात वाजता सांगितलं, मी आज राजीनामा देणार आहे, मी माझ्या पत्नीशी आणि आईशी बोललो नाही. अजितदादांपेक्षा मी वयाने ४ वर्ष मोठा आहे, पण मी त्यांना सांगितलं, हे गोष्ट मोठ्या साहेबांच्या कानावर घालावी. मी अलिबागला गेलो. त्यानंतर अजितदादांची पत्रकार परिषद झाली, अजितदादांनी राजीनामा दिला. त्यानंतर छगन भुजबळांसह सगळे नेते देवगिरी बंगल्यावर आल्या, त्यावेळी सगळ्यांनी त्यांना राजीनामा का दिला विचारला."
advertisement
"आज या गोष्टीचा उल्लेख करावा वाटला, राजकीय वाटचाल एका दिवसामध्ये होत नाही. देशपातळीवर तर होत नाही. अजितदादांनी कणखरपणे नेतृत्व केलं. २०१४ साली आपण बाहेरून सरकारला पाठिंबा दिलाा होता. २०१९ मध्ये काय झालं, सगळ्यांनी पाहिलं. २०२३ मध्ये एका निर्णयाच्या क्षणी अजितदादांना एकटं वाटलं. त्यावेळी अजितदादा, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे होते, एका निर्णयासाठी मी जात आहे. तुम्ही साथ देणार असाल तर निर्णय एकट्याने घेईल. आाम्ही सर्वांनी सांगितलं, दाादा तुम्ही आमचे नेते आहात, महाराष्ट्र घडवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. त्यानंतर ३ जुलै रोजी राज्य सरकार आणि एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय आपण घेतला.
advertisement
अजितदादांना लोकांनी हिणवलं पण त्यांनी कामं केली
५ जुलै रोजी एमईटीमध्ये आपला मेळावा झाला. अजितदादांनी कणखर निर्णय घेतला, त्यावेळेस अजितदादांनी सगळं मनातलं बोलून दाखवलं. शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहणार असं दादांनी बोलून दाखवलं. कणखरपणे निर्णय का घ्यावा लागतो, हे अजितदादांनी त्यावेळी सगळं सांगितलं. टिका टिप्पणी झाली. पण जनतेसाठी काम केलं. अल्पसंख्याक विभागासाठी चांगलं काम केलं. लाडकी बहिण योजना आणली. मध्यंतरी दुधवालाही सकाळी उठतो, दादांना हिणवलं गेलं. पेपरवाला पण सकाळी येतो, पण अजितदादा हे जनतेच्या सेवेसाठी येत होते. त्यांची सकाळी उठण्याची सवय ही घरात वहिणींमुळे होते. दादांची राजकीय इच्छाशक्ती प्रचंड होती, क्षमता यामुळे ४१ जागा आम्ही जिंकलो. विदर्भ मराठवाड्यात चांगल्या जागा आपण जिंकलो होतो.
advertisement
सुनेत्रा पवार पर्वाला सुरुवात
राजधर्म आणि धर्मशास्त्राचं पालन करण्याचं काम आम्ही केलं म्हणूनच डीसीएम आणि सभागृह नेता सुनेत्रा पवार यांना केलं. काही पैसे देऊन ट्रोल करायचे टीका करायचे ते करा पण आता सांगतो सुनेत्रा पर्व ही आजपासून सुरू झालं आहे, असंही यावेळी सुनील तटकरेंनी ठणकावून सांगितलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 6:26 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
'सुनेत्रा पवारांचा पराभव झाला, त्या दिवशी 5 वाजता अजितदादांनी फोन केला', तटकरेंनी बोलता बोलता बरंच सांगितलं





