Rashmika-Vijay Wedding: उदयपूरमध्ये 'विरोश'चा शाही विवाह संपन्न! रश्मिकाने शेअर केले लग्नातील पहिले फोटो, क्यूट कॅप्शन चर्चेत
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rashmika-Vijay Wedding: एका अतिशय देखण्या सोहळ्यात विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना अधिकृतपणे पती-पत्नी झाले आहेत. सोशल मीडियावर या लग्नाचे पहिले फोटो येताच अवघ्या काही मिनिटांतच ते इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले.
उदयपूर: दोन मन, दोन वेगवेगळ्या संस्कृती आणि अनेक वर्षांचं लपून-छपून केलेलं प्रेम... अखेर आज उदयपूरच्या आयटीसी मेमेंटोसमध्ये एका अतिशय देखण्या सोहळ्यात विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना अधिकृतपणे पती-पत्नी झाले आहेत. सोशल मीडियावर या लग्नाचे पहिले फोटो येताच अवघ्या काही मिनिटांतच ते इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले. रश्मिकाने विजयसाठी लिहिलेली ती भावनिक पोस्ट वाचून चाहत्यांचे डोळेही पाणावले आहेत.
आजचा दिवस या जोडीसाठी खूप धावपळीचा पण तितकाच आनंदाचा होता. सकाळी विजयच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार तेलुगू पद्धतीने लग्न लागलं, तर संध्याकाळी ५ वाजल्यापासून रश्मिकाच्या कोडावा रीतीरिवाजांना सुरुवात झाली. एकाच मंडपात दोन वेगवेगळ्या पद्धतींच्या अक्षता पडल्या. लग्नाच्या वेन्यूवर जागोजागी 'विरोश' नावाचे मोठे पोस्टर्स आणि फुलांची सजावट पाहून हे एखाद्या चित्रपटाच्या सेटसारखं वाटत होतं.
advertisement
विजयसाठी रश्मिकाचा हटके परफॉर्मन्स
लग्नापूर्वीची संगीत संध्याकाळ अत्यंत फिल्मी ठरली. या कार्यक्रमात रश्मिकाने तिच्या 'पुष्पा २' मधील सुपरहिट गाण्यावर 'अंगारों' वर डान्स केला. आपल्या होणाऱ्या पत्नीचा हा अंदाज पाहून विजय देवरकोंडा खूपच खूश झाला होता. विज्युला रश्मिकाने दिलेलं हे सर्वात मोठं सरप्राईज होतं. याच सोहळ्यात विजयच्या आईने रश्मिकाला त्यांच्या घराण्याची खानदानी सोन्याच्या बांगड्या भेट म्हणून दिल्या, ज्यावर संपूर्ण कुटुंबाच्या प्रेमाची मोहोर उमटली.
advertisement
रश्मिकाच्या क्यूट पोस्टवर चाहत्यांचा प्रेमाचा वर्षाव
लग्नानंतर रश्मिकाने एक अतिशय हळवी पोस्ट शेअर केली आहे. ती लिहिते, "हाय माय लव्हज, आज मी तुम्हाला माझ्या नवऱ्याची ओळख करून देतेय... मिस्टर विजय देवरकोंडा! ज्या माणसाने मला खरं प्रेम काय असतं हे शिकवलं, ज्याने मला सांगितलं की मोठी स्वप्नं पाहणं कधीही चुकीचं नसतं. विज्यू, माझ्या आयुष्यातील प्रत्येक यश, संघर्ष आणि आनंद आता अधिक अर्थपूर्ण वाटू लागला आहे, कारण तू माझ्यासोबत आहेस. तुझी 'बायको' म्हणून ओळखली जाण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. आता फक्त पार्टी करायचीय!"
advertisement
advertisement
या खाजगी विवाहसोहळ्याला दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि तरुण भास्कर यांसारखे मोजकेच जवळचे मित्र उपस्थित होते. पण चित्रपटाच्या दुनियेतील इतर सहकाऱ्यांसाठी ४ मार्च रोजी हैदराबादमध्ये एक भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे. तिथे साऊथपासून बॉलीवूडपर्यंतचे सर्व दिग्गज हजेरी लावणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 6:55 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rashmika-Vijay Wedding: उदयपूरमध्ये 'विरोश'चा शाही विवाह संपन्न! रश्मिकाने शेअर केले लग्नातील पहिले फोटो, क्यूट कॅप्शन चर्चेत







