advertisement

Sunetra Pawar:अजितदादांचं नाव उच्चारताना सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात आलं पाणी, सभागृह गहिवरलं, VIDEO

Last Updated:

"अजितदादा आपल्यात नाही हे अजूनही मान्य नाही. हा आघात मोठा आहे, पण वास्तव स्विकारलं पाहिजे, आणि यातून आपण सावरलं पाहिजे''

News18
News18
मुंबई: "आपल्या सर्वांचे आवडते, नेते, मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या जाण्यानं अजूनही आपलं सावरलो नाही, त्यांच्या जाण्याने आपल्या आयुष्यात आणि पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून येणारनाही. याची आपल्याला जाणीव आहे, प्रत्येकाच्या मनात एकच नाव आहे, ते....अजितदादा" असं बोलताना राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले.
"आपल्या सर्वांचे आवडते, नेते, मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या जाण्यानं अजूनही आपलं सावरलो नाही, त्यांच्या जाण्याने आपल्या आयुष्यात आणि पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून येणारनाही. याची आपल्याला जाणीव आहे, प्रत्येकाच्या मनात एकच नाव आहे, ते....अजितदादा. महाराष्ट्राच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी, आपल्या पक्षासाठी झटत राहिले,  त्यांच्या अचानक जाण्याने सगळी स्वप्न अर्ध्यावर सोडून जावी लागली. पण, त्यांची स्वप्न अर्धवट राहणार नाही, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, ते स्वप्न पूर्ण करून उंचावर नेऊ" असं म्हणताच सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यात पाणी आलं.
advertisement
[video width="1920" height="1080" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/02/WhatsApp-Video-2026-02-26-at-18.45.03-2026-02-c07b281abf88ed3a8072cc40c7c50842.mp4"][/video]
तसंच, "अजितदादा आपल्यात नाही हे अजूनही मान्य नाही. हा आघात मोठा आहे, पण वास्तव स्विकारलं पाहिजे, आणि यातून आपण सावरलं पाहिजे. राष्ट्रवादी पक्ष हा एक विचार आहे, एक परिवार आहे, हा परिवार महाराष्ट्राच्या समृद्धी आणि परिवर्तनाचाा आहे. तुमच्या आमच्या स्वाभिमान आणि अभिमानाचा आहे. या कठीण काळात आपल्याला आता पुढे जावं लागेल" असंही यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या.
advertisement
"दादांची जागा कुणीच भरून काढू शकत नाही. हे त्रिवार सत्य आहे. अजितदादांनी दाखवलेला विकासाचा मार्ग, त्यांनी घडवलेला एक एक कार्यकर्ता, त्यांची शिस्त हीच खरी राष्ट्रवादीची ताकद आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ३० जून २०२३ रोजी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारली, अजितदादांना अडीच वर्षांचा काळ मिळाला पण त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Sunetra Pawar:अजितदादांचं नाव उच्चारताना सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात आलं पाणी, सभागृह गहिवरलं, VIDEO
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement