advertisement

आपल्या सर्वांचे आवडते नेते, मार्गदर्शक... अजितदादांबद्दल बोलताना सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर

Last Updated:

Sunetra Pawar Speech: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर त्यांनी नेते, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना उद्देशून भाषण केले.

सुनेत्रा पवार
सुनेत्रा पवार
मुंबई : अजितदादांच्या जाण्यानंतर माझ्यासाठी अनेक क्षण वेदनादायी आहेत. परंतु अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणे हा क्षण माझ्यासाठी लाखो कार्यकर्त्यांची जबाबदारी स्वीकारणारा आहे. मी पक्षाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल, असे सांगतानाच अजित पवार यांचे नाव घेताच सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. अजित पवार या वादळाशी ४० वर्षे संसार गेला. त्यांची उणीव कुणीही भरून काढू शकणार नाही. पण त्यांच्या विचारांवर पावले टाकून आपल्याला पक्ष पुढे न्यायचा आहे, असे कणखरपणे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर त्यांनी नेते, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना उद्देशून भाषण केले. मुंबईतील वरळी डोम येथे पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, आदिती तटकरे, विधानसभा आणि विधान परिषदेचे सर्व आमदार, राज्यभरातले पदाधिकारी उपस्थित होते.
advertisement

संकटाला तोंड देणारा सह्याद्री आता आपल्यात नाही

अजित पवार यांच्या अकाली जाण्यानंतर त्यांचे विचार पुढे नेण्याची आपली जबाबदारी आहे. त्यांचे कोणतेच स्वप्न अपुरे राहणार नाही, याची काळजी आपण घेऊ. संकटाच्या काळात अजित पवार यांनी पक्ष नेटाने उभा केला, चालवला. परंतु संकटाला तोंड देणारा सह्याद्री आता हयात नाही. पक्षाला पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपल्याला झटावे लागेल, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
advertisement
[video width="1920" height="1080" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/02/WhatsApp-Video-2026-02-26-at-6.45.03-PM-2026-02-e06cad3a40d7191d50a7d4c9c3543caf.mp4"][/video]

अजितदादा नाहीत वास्तव मान्य करायला हवं, दु:खातून बाहेर पडले पाहिजे

अजित पवार जाणे हा धक्का होता. त्यांची पोकळी कुणीच भरून काढू शकत नाही. राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर अजित पवार यांनी राज्य पिंजून काढले होते. अजित पवार यांची स्वप्ने अपूर्ण राहणार नाहीत, याची आपण काळजी घेऊ. अजितदादा नाहीत हे वास्तव मान्य करायला पाहिजे. या दु:खातून बाहेर पडले पाहिजे, सावरले पाहिजे. राष्ट्रवादी एक विचार आहे, परिवार आहे. पक्षाने अनेक अडअडचणी येऊनही निवडणुकीत दमदार कामगिरी केली. आताही एकसंधपणे काम करून पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे, त्यादृष्टीने काम करायला हवे, अशी अपेक्षा सुनेत्रा पवार यांनी बोलून दाखवली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आपल्या सर्वांचे आवडते नेते, मार्गदर्शक... अजितदादांबद्दल बोलताना सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement