advertisement

Ice Massage : चेहऱ्यावर बर्फ का आणि कसा लावायचा ? बर्फ चोळल्यामुळे चेहऱ्यात काय फरक पडतो ?

Last Updated:

Ice Massage हा शब्द सध्या ट्रेंडमधे असला तरी, त्वचेसाठी गुणकारी म्हणून वापरली जाणारी ही एक जुनी पद्धत आहे. चेहऱ्यावर बर्फ चोळल्यानं रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळे तुमच्या त्वचेला आवश्यक पोषक घटक  आणि ऑक्सिजन मिळतो. याचा तुमच्या त्वचेवर थेट परिणाम होतो आणि चेहऱ्यावरची उघडी छिद्र म्हणजेच open poresशी संबंधित समस्या देखील कमी होतात. समजून घेऊया Ice Massage कसा फायदेशीर.

News18
News18
मुंबई : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर किंवा सेलेब्रिटी विविध व्हिडिओ शेअर करतात, त्यात ice massage चे व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील. अनेक जण मेकअपच्या आधी ice massage करतात.
Ice Massage हा शब्द सध्या ट्रेंडमधे असला तरी, त्वचेसाठी गुणकारी म्हणून वापरली जाणारी ही एक जुनी पद्धत आहे. चेहऱ्यावर बर्फ चोळल्यानं रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळे तुमच्या त्वचेला आवश्यक पोषक घटक  आणि ऑक्सिजन मिळतो. याचा तुमच्या त्वचेवर थेट परिणाम होतो आणि चेहऱ्यावरची उघडी छिद्र म्हणजेच open poresशी संबंधित समस्या देखील कमी होतात. समजून घेऊया Ice Massage कसा फायदेशीर.
advertisement
सूज : सकाळी उठल्यावर तुमचा चेहरा किंवा डोळे सुजलेले वाटत असतील, तर बर्फाचा तुकडा चोळल्यानं त्वरित आराम मिळेल.
मुरुमं : बर्फामुळे मुरुमांचा लालसरपणा आणि सूज कमी करण्यास मदत होते, ज्यामुळे ते लवकर सुकण्यास मदत होते.
चेहरा : यामुळे चेहऱ्यावरची उघडी छिद्र म्हणजेच open pores घट्ट करण्यास मदत होते, ज्यामुळे तुमची त्वचा नितळ दिसते.
advertisement
सुरकुत्या : नियमित वापराने, बारीक रेषा आणि सुरकुत्या तयार होण्यास आळा बसतो.
मेकअप : मेकअप लावण्यापूर्वी बर्फ चोळल्यानं मेकअप जास्त काळ टिकण्यास मदत होते आणि त्वचेला नैसर्गिक चमक येते.
Ice Massage कसा करायचा?
स्वच्छ सुती कापड किंवा मऊ टॉवेल घ्या. एक किंवा दोन बर्फाचे तुकडे घ्या. बर्फाचे तुकडे कापडात गुंडाळा. तुमची त्वचा संवेदनशील असेल तर त्वचेवर बर्फ थेट लावू नका. कापडात गुंडाळलेला बर्फ तुमच्या चेहऱ्यावर गोलाकार फिरवा, हळूवारपणे घासा. कपाळावर, गालावर, हनुवटीवर आणि डोळ्यांखालील भागावर लक्ष केंद्रित करा. हे केवळ एक ते दोन मिनिटं करा. यामुळे त्वचा ताजीतवानी वाटेल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Ice Massage : चेहऱ्यावर बर्फ का आणि कसा लावायचा ? बर्फ चोळल्यामुळे चेहऱ्यात काय फरक पडतो ?
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement