T20 World Cup : आफ्रिकेच्या विजयानंतर ग्रुप ए मध्ये ड्रामा, सेमी फायनलच्या रेसमध्ये अजूनही 4 टीम!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपचा थरार आता पुढच्या टप्प्यावर पोहोचला आहे. सुपर-8 मध्ये दोन विजय मिळवूनही दक्षिण आफ्रिका अजून सेमी फायनलला पोहोचली नाही. या रेसमध्ये अजूनही 4 टीम आहेत.
advertisement
advertisement
दोन विजय मिळवलेल्या दक्षिण आफ्रिकेचं सेमी फायनलला क्वालिफाय होणं जवळपास निश्चित आहे. आफ्रिकेचा शेवटचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध आहे,. या सामन्यात विजय मिळवून आफ्रिका सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल. तसंच भारताने त्यांचे उरलेले दोन सामने जिंकले आणि आफ्रिकेचा झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाला तरीही दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये जाईल.
advertisement
दुसरीकडे टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचण्यासाठी झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजचा पराभव करावा लागणार आहे. टीम इंडियाने झिम्बाब्वेचा पराभव केला आणि वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना गमावला तरी भारतीय टीमचं आव्हान संपुष्टात येईल. भारताने झिम्बाब्वे, वेस्ट इंडिजला हरवलं तर भारतीय टीम आणि दक्षिण आफ्रिका सेमी फायनलला पोहोचेल.
advertisement
advertisement








