साधारणपणे हे फोड काही दिवसांत आपोआप बरे होतात. पण जर तुम्हाला ही समस्या वारंवार होत असेल किंवा एखादा फोड बराच काळ टिकून असेल, तर मात्र सावध होण्याची गरज आहे. तुमची जीभ केवळ चव सांगत नाही, तर तुमच्या शरीरात आत काहीतरी गडबड सुरू आहे, याचे संकेतही देत असते. चला तर मग, जीभेवरील येणाऱ्या तोंडामागचं नेमकं विज्ञान आणि धोक्याच्या सूचना समजून घेऊया.
advertisement
नेमकी कारणं काय असू शकतात?
जीभेवर फोड येण्यामागे अनेक साधी कारणं असतात
शरीरात व्हिटॅमिन बी-12 आणि व्हिटॅमिन सी ची कमतरता असल्यास तोंडात किंवा जीभेवर वारंवार फोड येतात.
जर तुमचं पोट साफ नसेल किंवा अपचनाचा त्रास असेल, तर त्याचे परिणाम जीभेवर दिसू लागतात.
अतिशय तिखट, मसालेदार किंवा कडक गरम अन्न खाल्ल्याने जीभेचा नाजूक थर पोळतो. तसेच, जेवताना चुकून जीभ दातात चावली गेल्यामुळेही जखम होते.
वाढता मानसिक ताण आणि महिलांमध्ये होणारे हार्मोनल बदल हे देखील फोडांचे कारण ठरू शकतात.
वारंवार येणारे फोड 'या' आजारांचे लक्षण असू शकतात
लेडी हार्डिंग हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉ. एल. एच. घोटेकर यांच्या मते, जर हे फोड 10-15 दिवसांत बरे होत नसतील, तर ते केवळ उष्णतेचं लक्षण नाही.
1. रोगप्रतिकारशक्ती : तुमची इम्युनिटी कमकुवत झाली असल्यास शरीराला संसर्गाशी लढता येत नाही, ज्यामुळे फोड वारंवार येतात.
2. संसर्ग : काही वेळा हे बॅक्टेरिअल किंवा फंगल इन्फेक्शनचे संकेत असू शकतात.
3. गंभीर आजार: जर फोडातून रक्त येत असेल, प्रचंड वेदना होत असतील किंवा फोडाची जागा कडक झाली असेल, तर ते तोंडाच्या कर्करोगासारख्या गंभीर स्थितीचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
बचावासाठी काय कराल?
हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश करा. पुरेसं पाणी प्या जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहील.
तोंडाची स्वच्छता महत्त्वाची आहे. दिवसातून दोनदा ब्रश करा आणि जीभ नीट साफ ठेवा.
तंबाखू, सुपारी आणि अल्कोहोलमुळे तोंडातील पेशींना इजा पोहोचते, त्यामुळे या गोष्टी टाळणेच हिताचे आहे.
डॉक्टरांकडे कधी जावे?
पुढील लक्षणे दिसल्यास घरगुती उपाय करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे:
जर फोड 15 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून असेल.
छाल्यांसोबत ताप येत असेल.
फोडातून रक्त येत असेल किंवा जखम वाढत असेल.
गिळताना किंवा बोलताना असह्य वेदना होत असतील.
जीभ हा आपल्या शरीराचा आरसा आहे. त्यावर येणारे फोड तुम्हाला शरीराच्या आतील आरोग्याबद्दल सांगत असतात. त्यामुळे त्यांना केवळ साधी उष्णता म्हणून सोडून देऊ नका, तर आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्या.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)
