TRENDING:

5 Minutes Curry : ट्राय करा शेफ विकास खन्नाची खास 5 मिनिट्स करी रेसिपी! बनवायला सोपी, चव तर एक नंबर..

Last Updated:

Chef Vikas Khanna Special 5 Minutes Curry : ही रेसिपी आहे शेफ विकास खन्ना यांची. मात्र ही रेसिपी captain_amaira या अकाऊंटवर पुन्हा शेअर केली गेली आहे. ही आहे 5 मिनिटात बनणारी अननसाची करी किंवा भाजी.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जेव्हा आपल्याला स्वयंपाकाचा अगदीच कंटाळा आलेला असतो किंवा थकलेले असताताना अजिबात इच्छा होत नाही किचनमध्ये जाण्याची, तेव्हा आपण काहो सोप्या रेसिपीज शोधत असतो. ज्या आपल्याला करायला जास्त वेळ लागणार नाही आणि त्याने आपलं पोट मन दोन्ही तृप्त होईल. तुम्हीही कधीतरी अशा परिस्थितीत सापडत असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी बेस्ट आहे.
इन्स्टंट अननस करी बनवण्याची पद्धत..
इन्स्टंट अननस करी बनवण्याची पद्धत..
advertisement

ही रेसिपी आहे शेफ विकास खन्ना यांची. मात्र ही रेसिपी captain_amaira या अकाऊंटवर पुन्हा शेअर केली गेली आहे. ही आहे 5 मिनिटात बनणारी अननसाची करी किंवा भाजी. भाजीची तयारी धरून ही रेसिपी 5 ते 7 मिनिटांत पूर्णपणे तयार होते. या करीची चवही अगदी अप्रतिम आणि रिफ्रेशिंग आहे. चला तर मग पाहूया इन्स्टंट अननस करी रेसिपी.

advertisement

इन्स्टंट अननस करी बनवण्यासाठी लागणारे साहित्य..

- सोलून तुकडे केलेले ताजे अननस

- 1 कप नारळाचे दूध

- 2 चमचे तांदळाचे पीठ

- नारळाचे तेल

- मोहरी

- जिरे

- हळद पूड

- चिरलेल्या हिरव्या मिरच्या

- चिरलेले आले आणि लसूण

- चिरलेला कढीपत्ता

- लाल मिरची पावडर

- चवीनुसार मीठ

advertisement

- अर्ध्या लिंबाचा रस

इन्स्टंट अननस करी बनवण्याची पद्धत..

- पॅनमध्ये नारळाचे तेल गरम करा.

- त्यामध्ये मोहरी आणि जिरे घाला.

- मोहरी जिरं तडतडलं की त्यामध्ये आले, लसूण, हिरव्या मिरच्या घाला.

- यानंतर लगेच नारळाचे दूध घाला आणि सतत ढवळत रहा.

- नंतर यामध्ये तांदळाचे पीठ घाला. त्यासोबत हळद, मीठ आणि लिंबाचा रस पिळून घ्या.

advertisement

- आता तुमची ग्रेव्ही तयार आहे.

- पुढे सूर्य एका पानामध्ये अननसाचे तुकडे कढीपत्ता घाला.

- नंतर त्यामध्ये हळद, मीठ आणि लाल तिखट घालून मिक्स करा.

- हे सर्व थोडंसं परतून घ्या.

- तळलेले अननसाचे तुकडे ग्रेव्हीमध्ये घाला.

अशाप्रकारे तुमची सोपी आणि स्वादिष्ट अननस भाजी तयार आहे. एकदा ही नक्की ट्राय करून पाहा. तुम्हाला नक्की आवडेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
150 रुपयांना खरेदी करा अन् 300 ला विका, पिंपरीत ट्रेंडी कुर्तींचं होलसेल मार्केट
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
5 Minutes Curry : ट्राय करा शेफ विकास खन्नाची खास 5 मिनिट्स करी रेसिपी! बनवायला सोपी, चव तर एक नंबर..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल