TRENDING:

Tears : रडू नका नाही रडा आणि मोकळं व्हा, रडणं म्हणजे कमकुवतपणा नाही, वाचा हसण्याप्रमाणेच रडण्याचे उपयोग

Last Updated:

रडणं हे कमकुवतपणाचं लक्षण आहे असा समज आहे. जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपण आपले अश्रू लपवायला शिकतो. पण रडणं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. रडण्यामुळे हृदय हलकं होतं तसंच शरीर आणि मन दोन्हीसाठी हे एक नैसर्गिक औषध आहे. जाणून घेऊया सविस्तर. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आनंद असो किंवा दु:ख..ही भावना व्यक्त करताना डोळे आपसूक ओले होतात. काही वेळा ही तीव्रता कमी जास्त असते. आनंद, वेदना, दु:ख सजीव प्राणी या भावना अश्रूंद्वारे व्यक्त करतातच. पण कोण काय म्हणेल या विचारामुळे ते रोखले जातात.
News18
News18
advertisement

रडणं हे कमकुवतपणाचं लक्षण आहे असा समज आहे. जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपण आपले अश्रू लपवायला शिकतो. पण रडणं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. रडण्यामुळे हृदय हलकं होतं तसंच शरीर आणि मन दोन्हीसाठी हे एक नैसर्गिक औषध आहे. जाणून घेऊया सविस्तर.

Water Intake : हिवाळ्यात वाढतो डिहायड्रेशनचा धोका, वेळीच सावध व्हा, पाणी प्या

advertisement

रडण्यामुळे एंडोर्फिनसारखे हार्मोन्स बाहेर पडतात. यामुळे मन शांत व्हायला मदत होते. यामुळे राग, चिडचिड आणि चिंता कमी होते आणि मनःस्थिती सुधारते.

हृदयावरचं ओझं हलकं करा - रडणं हा तुमच्या हृदयावरील ओझे हलका करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. भावना दीर्घकाळ दाबल्या जातात तेव्हा मन जड आणि अस्वस्थ होतं. रडण्यानं मन शांत होतं.

advertisement

भावनिक संतुलन - आपण कोणासमोर उघडपणे रडतो तेव्हा ते आपल्या खऱ्या भावना प्रकट होतात. दुःख,  आनंद, घाबरणं, तणाव यामुळे रडू येतं.

Diabetes : न्याहारीतले हे पदार्थ वाढवतात रक्तातली साखर, या पदार्थांना ढकला दूर

ताण कमी होतो - जास्त वेळ रडल्यानं ऑक्सिटोसिन हार्मोन बाहेर पडतं. हे संप्रेरक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. रडता तेव्हा शरीरातून आपोआप ताण बाहेर पडतो. म्हणूनच रडल्यानंतर बरं वाटतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

वेदना कमी होतात - रडताना, शरीर एंडोर्फिन नावाचं संप्रेरक रिलीज करतं. यामुळे वेदना कमी करण्यास मदत होते. म्हणूनच, रडल्यानं अनेकदा शारीरिक आणि मानसिक वेदनांपासून आराम मिळतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tears : रडू नका नाही रडा आणि मोकळं व्हा, रडणं म्हणजे कमकुवतपणा नाही, वाचा हसण्याप्रमाणेच रडण्याचे उपयोग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल