TRENDING:

Dengue Care: डेंग्यूची कारणे, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध, जाणून घ्या सर्व काही...

Last Updated:

डेंग्यू झाल्यास शरीराला बराच त्रास होतो. त्यामुळे तो होऊ न देणे हेच सर्वांत महत्त्वाचं आहे; मात्र काळजी घेऊनही डेंग्यू झालाच, तर कशी काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेऊया. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 27 सप्टेंबर : डेंग्यू हा एक विषाणूजन्य आजार आहे. एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासांच्या माध्यमातून या विषाणूजन्य आजाराचा फैलाव होतो. डेंग्यू झाल्यास शरीराला बराच त्रास होतो. त्यामुळे तो होऊ न देणे हेच सर्वांत महत्त्वाचं आहे; मात्र काळजी घेऊनही डेंग्यू झालाच, तर कशी काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेऊया.
News18
News18
advertisement

डासांच्या माध्यमातून डेंग्यू पसरतो. साचलेल्या पाण्यात किंवा सांडपाण्यात डासांची पैदास होते. त्यामुळे पाणी किंवा सांडपाणी साचून देणं सर्वांत महत्त्वाचं आहे. डेंग्यूच्या आतापर्यंत तीनच स्ट्रेन्स होत्या; मात्र आता DENV-4 हा चौथा स्ट्रेनही आलेला आहे. डेंग्यूचा ताप आणि डेंग्यूचा रक्तस्रावी ताप असे त्याचे दोन प्रकार आहेत. डेंग्यूचा ताप हा गंभीर फ्लूसारखा आजार आहे, तर डेंग्यू रक्तस्रावी ताप हे त्याचं गंभीर रूप असून, त्यात मृत्यूही होऊ शकतो.

advertisement

वाचा-शांती आणि संपत्तीचं होईल आगमन; वास्तूनुसार घरात ठेवा ‘ही’ रोपं

डेंग्यू खूप संसर्गजन्य आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीला चावलेला डास निरोगी व्यक्तीला चावला, तर त्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो. एडिस इजिप्ती हे छोटे, काळ्या रंगाचे डास असतात. त्यांचं पोट आणि पायांवर पांढऱ्या रंगाच्या रेषा असतात. त्यांना टायगर मॉस्क्विटोज असंही म्हटलं जातं. घरात आणि घराबाहेर साचलेल्या पाण्यात त्यांची पैदास होते. हे डास दिवसा जास्त सक्रिय असतात. खूप लाइट्स असले, तर हे डास रात्रीही चावू शकतात. सर्वसाधारणपणे हे डास सकाळी आणि संध्याकाळी चावतात.

advertisement

डेंग्यूची लक्षणं विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर 3 ते 14 दिवसांत दिसू लागतात.

- अचानक खूप ताप येणं

- डोकेदुखी, खासकरून डोळ्यांच्या पाठीमागे

- चेहऱ्यावर निस्तब्धता

- स्नायू आणि सांधेदुखी

- भूक कमी होणं

- त्वचेवर लाल चट्टे

- थंडी वाजणं

- घसा खराब होणं

- नाकातून किंवा हिरड्यांतून रक्तस्राव किंवा लघवीतून रक्त जाणं

advertisement

संरक्षण कसं करायचं?

- डास प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात.

- घरात मच्छरदाणी लावून झोपावं.

- पूर्ण शरीर झाकणारे कपडे घालावेत.

- आठवड्यातून किमान एकदा तरी साचलेलं पाणी साफ करावं, घरातल्या छोट्या भांड्यांत साठवलेलं पाणीही बदलावं.

- दारं-खिडक्यांना जाळ्या लावाव्यात.

- पाणी साठवलेली भांडी झाकून ठेवावीत.

- डेंग्यू झाल्यास बेड रेस्ट घ्यावी, आराम करावा.

advertisement

डेंग्यू झाला, तर आहारात या गोष्टींचा समावेश करावा.

- व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेली फळं जास्त खावीत. किवी, संत्री, लिंबू, डाळिंब, नासपती या फळांचा आहारात समावेश करावा.

- ज्यूस, सूप, पाणी जास्त प्रमाणात प्यावं.

- पपईच्या पानांचा रस कच्चा प्यावा.

- गुळवेलीचा रस प्यावा.

- हिरव्या पालेभाज्या, आळशी, बदाम, अक्रोड आदींचा आहारात समावेश करावा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

- हळद, आलं, लसूण यांची चटणी खावी.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dengue Care: डेंग्यूची कारणे, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध, जाणून घ्या सर्व काही...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल