शांती आणि संपत्तीचं होईल आगमन; वास्तूनुसार घरात ठेवा ‘ही’ रोपं
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
घर सजावटीमध्ये झाडांचा मोठा वाटा असतो. झाडं आणि वनस्पतींनी घर सजवल्यानं मनाला शांती मिळते.
पुणे, 27 सप्टेंबर : घर सजावटीमध्ये झाडांचा मोठा वाटा असतो. झाडं आणि वनस्पतींनी घर सजवल्यानं मनाला शांती मिळते. त्याचबरोबर झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. त्यासाठी तुम्ही घरच्या घरी ही छोटी रोपटी लावू शकता आणि घराला अतिशय फ्रेश आणि ताजा लुक देऊ शकता. तुम्हाला माहित आहे का की वास्तु नियमानुसार झाडे लावली तर सकारात्मकतेसोबतच घराच्या आर्थिक लाभाचे दरवाजेही उघडतात. याबद्दलच पुण्यातील वास्तूतज्ज्ञ उमा पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे.
पिस लिली (Peace Lily) : होम डेकोरमध्ये सर्वात लोकप्रिय इनडोअर प्लांट आहे पिस लिली. हे लिली प्रकारातले अरूम कुटुंबातील उष्णकटिबंधीय सदाहरित वनस्पती आहे. वास्तू टिप्सनुसार या रोपट्यामुळे घरात आनंद आणि उत्साह कायम राहतो. महत्वाचं म्हणजे हे रोपटं बेडरूममध्ये ठेवावं.
Vastu Tips : योग्य दिशेला पिगी बँक ठेवली तर उजळेल नशीब! पैशांची होईल भरभराट
रब्बर फिग प्लांट (Rubber Fig Plant) : रबराचे रोप घरामध्ये लावल्यास ते शुभ मानले जाते. घरासाठी रबर रोपामुळे वास्तुनुसार आर्थिक समृद्धी, संपत्ती आणि व्यावसायिक यश मिळवून देतात असे मानले जाते. रबर प्लांट नैऋत्य दिशेला ठेवल्यास त्याचा फायदा होतो.
advertisement
गोल्डन पोथोस (Golden Pothos) : गोल्डन पोथोस म्हणजे सामान्य भाषेत याला मनी प्लांट म्हणतात. हे रोपटं अतिशय चमकदार, हृदयाच्या आकाराची पाने असलेला आणि वेल प्रकारात मोडणारा आहे. महत्वाचं म्हणजे मनी प्लांटचं एक रोपटं घरात असेल तर तुम्ही त्यापासून असंख्य छोटी छोटी रोपटी तयार करू शकतात. घराची उत्तम भरभराट होण्यासाठी तुम्हाला गोल्डन पोथोस म्हणजे मनी प्लांट मदत करते. फक्त तुम्हाला हे घराच्या दक्षिण-पूर्व (South East) भागात ठेवायचं आहे.
advertisement
घराच्या दक्षिण दिशेला ‘ही’ रोपे लावणे टाळा; नाहीतर थांबू शकते प्रगती
जेड प्लांट (Jade Plant) : जेड वनस्पती नशीब आणि समृद्धी आणण्यासाठी ओळखली जाते आणि वाढीचे प्रतीक आहे. त्यामुळे मैत्री वाढेल असेही मानले जाते. वास्तुनुसार जडे वनस्पती आग्नेय दिशेला ठेवावी तसेच अगदी मुख्य दरवाजाजवळही हे रोप ठेवल्यास फायदा होतो. जेडला हलका प्रकाशही पुरेसा असतो. तसेच हे रोप अतिशय सुबक दिसतं. या झाडांमुळे तुमच्या घराला चांगला लुक येईलच पण यासोबतच वास्तुनुसार घराचं घरपणही या रोपांमार्फत जपलं जाणार आहे.
advertisement
कुंडलीतच नाही, घरावरही पडते राहूची छाया; 'हे' 5 संकेत अजिबात दुर्लक्षित करू नका!
स्नेक प्लांट (Snake Plant) : अनेकदा होम डेकोरमध्ये स्नेक प्लांटचा वापर केला जातो. कारण हे दिसायला अतिशय लोभस आणि नाजूक रोपटं आहे. यामुळे घरातील नकारात्मक वाईब्स निघून जातात. तसेच मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. या रोपट्यामुळे आतील हवा खेळती राहण्यास मदत होते. वास्तुनुसार हे घराच्या पूर्वेकडील कोपऱ्यात ठेवावे. यामुळे याचा अधिक फायदा घराला आणि घरातील व्यक्तींना होतो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Sep 27, 2023 9:13 PM IST









