advertisement

Baramati: '...तर माझी उमेदवारी लगेच मागे घेतो', तिकीट जाहीर होताच काँग्रेस उमेदवाराची सरकारला 'ऑफर', एका दगडात दोन पक्षी

Last Updated:

Baramati Bypoll Congress Akash More: बारामती विधानसभेतील धनगर मतांना डोळ्यासमोर ठेवून मोरे यांच्या रूपाने काँग्रेसने 'धनगर कार्ड' खेळल्याचीही चर्चा आहे.

आकाश पवार (काँग्रेस उमेदवार)
आकाश पवार (काँग्रेस उमेदवार)
बारामती (पुणे) : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आकाश विजय मोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. पवारांच्या बारामतीत काँग्रेस कोणत्या बड्या चेहऱ्याला उमेदवारी देणार, याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले असताना पक्षाने सर्वसामान्य कार्यकर्त्याला रिंगणात उतरवून मोठी चाल खेळली. तसेच बारामती विधानसभेतील धनगर मतांना डोळ्यासमोर ठेवून मोरे यांच्या रूपाने काँग्रेसने 'धनगर कार्ड' खेळल्याचीही चर्चा आहे.
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी खुद्द सुनेत्रा पवार यांनी बरेच प्रयत्न करूनही काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात लढायचेच, अशी रणनीती काँग्रेस पक्षाने आखली होती. त्यानुसार रविवारी रात्री राजधानी नवी दिल्लीतून पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या आदेशाने आकाश विजय मोरे यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केले.
advertisement

'...तर माझी उमेदवारी लगेच मागे घेतो', आकाश मोरेंनी भावनिक डाव टाकला

उमेदवारी जाहीर होताच आकाश मोरे यांनी काँग्रेस पक्षाचे आभार मानले. बारामतीत अनेक मुद्दे आहेत. त्यातील अनेक मुद्द्यांपैकी समाजहिताच्या प्रश्नांवर मी निवडणूक लढवणार आहे. अजित पवार यांच्या अपघाताचा प्रश्न आहे. पण कित्येकांनी प्रयत्न करूनही राज्य सरकारने अद्याप त्याअनुषंगाने गुन्ह्याची नोंद केलेली नाही. जर राज्य सरकारने अजित पवार यांच्या अपघाताच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला तर माझी उमेदवारी लगोलग मागे घेईन, अशी खुली ऑफरच आकाश विजय मोरे यांनी महायुतीला दिला. यामाध्यमातून त्यांनी अजित पवार यांच्या बाजूने असलेली सहानुभूतीची लाट आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला.
advertisement

काँग्रेसचा धनगर मतांना चुचकारण्याचा प्रयत्न

बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला. परंतु रणनीती आखून निवडणुकीला सामोरे गेले तर आश्चर्यकारक निकालाची शक्यता निर्माण होऊ शकते, हे धनगर नेते महादेव जानकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले होते. लाथ-दोन लाखांच्या फरकांनी जिंकणाऱ्या सुप्रिया सुळे यांचा केवळ ७० हजार मतांनी विजय झाला होता. आताही काँग्रेस पक्षाने धनगर चेहऱ्याला संधी देऊन धनगर मतांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे.
advertisement

कोण आहे आकाश मोरे?

आकाश मोरे हे कट्टर काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते सचिव आहेत
माजी आमदार विश्वनाथ मोरे यांचे ते सुपुत्र आहेत
२०१४ साली साली अजित पवार यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढविली होती
२०१४ साली सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवल्याने बारामतीत काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Baramati: '...तर माझी उमेदवारी लगेच मागे घेतो', तिकीट जाहीर होताच काँग्रेस उमेदवाराची सरकारला 'ऑफर', एका दगडात दोन पक्षी
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement