IPL 2026 : CSK ला एक No Ball भारी पडला, पठ्ठ्याने 280 च्या स्ट्राईक रेटने चोपलं, RCBचा या हंगामातला सर्वाधिक स्कोर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
खरं तर चेन्नई सुपर किंग्जच्या इतक्या धावा झाल्याच नसत्या, पण एका नो बॉलमुळे सगळी मॅच फिरली आहे. त्यामुळे नेमकं सामन्यात काय घडलं आहे. हे जाणून घेऊयात.
RCB vs CSK : आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने चेन्नई सुपर किंग्जच्या बॉलर्सची प्रचंड धुलाई केली आहे. यामुळे चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या हंगामातली सर्वोच्च धावसंख्या ठोकली आहे. खरं तर चेन्नई सुपर किंग्जच्या इतक्या धावा झाल्याच नसत्या, पण एका नो बॉलमुळे सगळी मॅच फिरली आहे. त्यामुळे नेमकं सामन्यात काय घडलं आहे. हे जाणून घेऊयात.
चेन्नई सुपर किंग्जने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्रथम फलंदाजीला उतरली होती. यावेळी चेन्नई सुपर किंग्जकडून विराट कोहली आणि फिल सॉल्टने चांगली सूरूवात केलीह होती. पण विराट कोहलीला मोठ्या धावा करता आल्या नाही आणि तो 28 वर धावांवर बाद झाला होता. त्याच्यानंतर फिल सॉल्ट देखील 46 धावांवर बाद झाला
advertisement
दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर देवदत्त पड्डीकल आणि कर्णधार रजत पाटीदार मैदानात आला होता.यावेळी पड्डीकलने 29 बॉलमध्ये 50 धावा ठोकल्या. त्यानंतर पड्डीकल बाद होतात टीम डेविड मैदानात होता. यावेळी पाटीदार आधीच मैदानात आतिषबाजी करत होता. त्याच्या जोडीला टीम डेविड आल्यानंतर त्याने देखील आतिषबाजी सूरूच ठेवली.
पण अंशुल कंबोजच्या 18 व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलला त्याने टीम डेविडची विकेट काढली.यावेळी डेविड हा 15 बॉलमध्ये 28 धावा करून खेळत होता. पण कंबोजचा तो बॉल नो ठरल्यामुळे डेविडला जीवनदान मिळालं.याचाच फायदा उचलून त्याने पुढच्या 10 बॉलमध्ये 45 धावा ठोकल्या.अशाप्रकारे त्याने 25 बॉलमध्ये 70 धावा केल्या. या दरम्यान त्याने 8 षटकार आणि तीन चौकार मारले.यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 280 होता. त्याच्यासोबत पाटीदार 19 बॉलमध्ये 48 धावा करून नाबाद राहिला. अशाप्रकारे दोन्ही खेळाडूंनी आरसीबीचा डाव हा 3 विकेट गमावून 250 पार नेला होता.त्यामुळे आता चेन्नई सुपर किंग्जसमोर 251 धावांचे लक्ष्य असणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 9:44 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : CSK ला एक No Ball भारी पडला, पठ्ठ्याने 280 च्या स्ट्राईक रेटने चोपलं, RCBचा या हंगामातला सर्वाधिक स्कोर









