advertisement

देशात वेळी अनेक क्लायमेट इफेक्ट Active, हवामान विभागाने असा अलर्ट कधीच दिला नव्हता; पाऊस, वादळ आणि गारपिटीचा इशारा

Last Updated:

Heavy Rain Alert: देशभरात अनेक हवामान प्रणाली सक्रिय झाल्यामुळे मुसळधार पाऊस, वादळ आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये जोरदार वारे आणि पावसाची शक्यता असून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

News18
News18
नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार एक वेस्टर्न डिस्टर्बन्स (Western Disturbance) सध्या सेंट्रल पाकिस्तान आणि आसपासच्या पंजाब भागात सक्रिय आहे. याशिवाय पश्चिम उत्तर प्रदेश, बंगालचा उपसागर आणि रायलसीमा या भागांमध्ये अपर एअर सायक्लोनिक सर्क्युलेशन (Cyclonic Circulation) देखील सक्रिय आहे.
यामुळे देशभरात अनेक हवामान प्रणाली सक्रिय झाल्या असून पाऊस, वादळ आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
या सर्व हवामान प्रणालींमुळे 7 एप्रिलपासून उत्तर-पश्चिम भारतात आणखी एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 5 आणि 6 एप्रिल रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच वादळ आणि विजांचा कडकडाटही होऊ शकतो. उत्तर प्रदेशात 5 एप्रिल रोजी तर पंजाब आणि राजस्थानमध्ये 6 एप्रिल रोजी पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
advertisement
7 ते 9 एप्रिलदरम्यान जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात व्यापक प्रमाणात पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली (Delhi NCR), पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये 7 आणि 8 एप्रिल रोजी पाऊस आणि जोरदार वारे वाहू शकतात. राजस्थानमध्ये 6 आणि 7 एप्रिल रोजी ताशी 70 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. काही राज्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता असून काश्मीर खोऱ्यात 7 एप्रिल रोजी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
advertisement
ईशान्य भारतात पुढील 5 दिवस हलक्या ते मध्यम पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय येथे वेगवेगळ्या दिवशी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व भारतात पुढील 5 दिवस पाऊस, वादळ आणि ताशी 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. बिहार, झारखंड आणि ओडिशा येथे वादळासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
advertisement
मध्य भारतातही पुढील 5 दिवस पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. छत्तीसगड आणि पश्चिम मध्य प्रदेशात गारपीटीचा अंदाज आहे. मराठवाडा आणि गुजरातमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि जोरदार वारे वाहू शकतात.
तसेच तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये पुढील 5 दिवस पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मच्छीमारांना विशेष सूचना देण्यात आली आहे की 7 ते 9 एप्रिलदरम्यान बंगालच्या उपसागरातील काही भागात आणि 6 ते 8 एप्रिलदरम्यान अरबी समुद्रातील काही भागात समुद्रात जाऊ नये.
view comments
मराठी बातम्या/देश/
देशात वेळी अनेक क्लायमेट इफेक्ट Active, हवामान विभागाने असा अलर्ट कधीच दिला नव्हता; पाऊस, वादळ आणि गारपिटीचा इशारा
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement