advertisement

2900 कोटींचा मालक अन् पायात फाटके बूट्स! सलमान खानची अवस्था पाहून फॅन्स चक्रावले, VIDEO

Last Updated:

Salman Khan Shoes Viral Video: सलमान खान हा देशातील सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रिटींपैकी एक आहे. असे असताना त्याचा फाटलेल्या बुटांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तो आगीसारखा व्हायरल झाला आहे.

News18
News18
मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खान सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नवी फिल्म असो, बिग बॉसचं सीझन असो किंवा मग त्याचं खाजगी आयुष्य असो, सलमानच्या चाहत्यांना त्याच्या आयुष्याबाबत प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची असते. पण सर्वांचा लाडका भाईजान सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकतंच सोशल मीडियावर सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्याच्या पायातील बूटांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सलमानने घातलेले हे बूट्स चक्क फाटलेले होते.
सलमान खान हा देशातील सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रिटींपैकी एक आहे. असे असताना त्याचा फाटलेल्या बुटांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तो आगीसारखा व्हायरल झाला आहे. अशातच आपल्या आवडत्या सुपरस्टारने असे फाटलेले बूट्स का घातले आहेत, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काही ट्रोलर्सनी सलमानला या प्रकारावर ट्रोल करायलाही सुरुवात केली. मात्र, या फाटक्या बुटांमागचं सत्य जेव्हा समोर आलं, तेव्हा ट्रोल करणाऱ्यांचेही डोळे विस्फारले आहेत.
advertisement

सलमानच्या फाटक्या बुटांमागचं नेमकं प्रकरण काय?

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सलमान खान आपल्या गाडीतून उतरताना दिसतोय. यावेळी त्याने चेक शर्ट, डोळ्यावर काळा गॉगल आणि हातात महागडं घड्याळ असा डॅशिंग लूक केला होता, ज्यात सलमान नेहमीप्रमाणेच स्टायलिश वाटत होता. पण कॅमेरा जेव्हा त्याच्या पायांकडे वळला, तेव्हा सर्वांना धक्काच बसला. सलमानने घातलेले बूट जागोजागी फाटलेले आणि मळलेले दिसत होते. २९०० कोटींची संपत्ती असलेल्या अभिनेत्याचे असे शूज पाहून सोशल मीडियावर वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.
advertisement
advertisement

फाटलेले नाही, तर लाखांचे बूट

दरम्यान, सलमान खानच्या फाटलेल्या बूटांचं रहस्य आता सॉल्व्ह झालं आहे. त्याने घातलेले हे बूट्स प्रत्यक्षात एका आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँडचे अत्यंत महागडे बूट असून या लूकला डिस्ट्रेस्ड लूक असं म्हणतात. जगभरातील श्रीमंत वर्गात सध्या कपडे आणि बूट जाणूनबुजून जुन्या आणि फाटलेल्या डिझाइनमध्ये बनवण्याची फॅशन ट्रेंडमध्ये आहे. त्यामध्ये आता सलमान खानही सहभागी झाला आहे. हे बूट दिसायला जरी भंगार वाटत असले, तरी त्यांची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. सलमानने यापूर्वी 'टायगर ३' च्या प्रमोशनवेळीही अशाच प्रकारचे बूट घातले होते, तेव्हाही असाच गदारोळ माजला होता.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
2900 कोटींचा मालक अन् पायात फाटके बूट्स! सलमान खानची अवस्था पाहून फॅन्स चक्रावले, VIDEO
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement