मुंबईकरांमध्ये डायबिटीस, हाय ब्लडप्रेशर, हार्ट ॲटॅक सारख्या गंभीर आजाराचं प्रमाण वेगाने वाढतंय. व्यायामाचा अभाव, जेवणाची बदलेली पद्धत आणि जंकफूड ही महत्वाची कारणं आहेत. या चुकीच्या सवयींमुळे टाइप 2 डायबिटीसच्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून आलंय.
advertisement
चुकीच्या सवयी कोणत्या ?
- अधिक वेळ उपाशी राहणे
- सतत तणावात असणे
- जास्तित जास्त वेळ बसून काम करणे
- वेळी अवेळी, अरबट चरबट खाणे
- अपुरी झोप
- धुम्रपान आणि मद्यपान
advertisement
डायबिटीसचा धोका टाळण्यासाठी काय करावं?
- एकाच जागी जास्त वेळ बसून काम करू नका. काम करत असताना दर अर्ध्या तासाने ब्रेक घेऊन थोडं चाला.
- फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, प्रथिने असलेला संतुलित आहार घ्या. जंक फूड खाणं टाळा.
- तणाव कमी करण्यासाठी योगासने करा.
- साखरेचं प्रमाण मर्यादित ठेवा.
- झोप आणि विश्रांतीचं योग्य व्यवस्थापन करा.
- धूम्रपान, मद्यपान सोडून द्यावं.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2024 6:57 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diabetes gripping Mumbaikar: तरूणांनो सावधान: ‘या’ चुकीच्या सवयीमुळे तुम्हाला होऊ शकतो डायबिटीस; आत्ताच बदला या सवयी नाहीतर येईल पश्चातापाची पाळी