Benefits of Methi vegetable: कडू असली तरीही खा मेथीची भाजी; दूर पळतील कॅन्सर आणि डायबिटीस
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Benefits of Methi vegetable: मेथी ही चवीला कडू असते, त्यामुळे अनेक जण मेथीच्या भाजीच्या नावाने नाकं मुरगडतात. मात्र मेथीची भाजी नुसती रुचकरच नव्हे, तर अनेक विकारांचा धोका कमी करणारी आहे. जाणून घेऊयात मेथीच्या भाजीचे फायदे.
मुंबई: मेथी ही चवीला कडू असते, त्यामुळे अनेक जण मेथीच्या भाजीच्या नावाने नाकं मुरगडतात. मात्र मेथीच्या पानांमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, व्हिटॅमिन के जास्त प्रमाणात आढळतात. मेथीची भाजी नुसती रुचकरच नव्हे, तर अनेक विकारांचा धोका कमी करणारी आहे.
जाणून घेऊयात मेथीची भाजी खाल्ल्याचे फायदे.
केसांच्या समस्या
मेथीत प्रोटीन आणि निकोटिनिक ॲसिड असते, जे केसांच्या मुळांना मजबूत बनवते. मेथीची पेस्ट बनवून केसांच्या मुळांवर लावल्यास केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. मेथीत लेसीथिन (Lecithin) असतं, ज्यामुळे केसांची चांगली वाढ होऊन केस चमकदार होतात. मेथीची पानं बारीक करून त्यांची पेस्ट आंघोळीच्या अर्धा तास आधी केसांना लावाल्यास कोंडा लवकर दूर होतो.
advertisement
त्वचा विकार
मेथी ही त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. तिच्यात असलेल्या अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे अनेक त्वचाविकार दूर होतात. मेथीच्या अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे मुरुमांचा त्रास कमी होतो. मेथीच्या दाण्याची पेस्ट मुरुमांवर लावल्यास सूज आणि जळजळ कमी होते. मेथीत असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेतील विषारी घटक काढून टाकतात आणि त्यामुळे त्वचा तजेलदार होते. मेथीचं पाणी नियमितपणे चेहऱ्यावर लावल्यास नैसर्गिक तजेला मिळतो. याशिवाय त्वचेवरील डाग, पिग्मेंटेशन, आणि काळी वर्तुळे कमी होतात.
advertisement

तोंडाचे आजार
मेथीच्या अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे ती अनेक तोंडाच्या आजारांवर फायदेशीर ठरते. घशाच्या सूज आली असेल किंवा जळजळीचा त्रास होत असेल तर त्यावरही मेथी गुणकारी आहे. मेथी कफ पातळ करण्यास मदत करते, त्यामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास कमी होतो.मेथीतल्या चिकट घटकांमुळे (mucilage) घशाला आराम मिळतो आणि खवखव कमी होते.मेथीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने ती जंतू नष्ट करण्यास आणि संसर्ग टाळण्यास मदत करते. आवाज बसल्यावर मेथीचा काढा पिणे किंवा मेथीच्या पाण्याच्या गुळण्या करणे फायदेशीर ठरते.
advertisement
पचन सुधारतं
मेथीमध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. तसंच मेथीच्या भाजीच्या सेवनाने भूक कमी लागते त्यामुळे वजन नियंत्रित राहायला मदत होते.
गंभीर आजार
मेथीच्या भाजीत गॅलॉक्टोमेनिन हा हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारा घटक असतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहून हृदयविकार टाळता येतात. मेथीच्या भाजीत असलेल्या अँन्टिऑक्सिडंट गुणधर्मामुळे कर्करोग, मधुमेहासारख्या गंभीर आजारांना दूर ठेवता येतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2024 6:02 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Benefits of Methi vegetable: कडू असली तरीही खा मेथीची भाजी; दूर पळतील कॅन्सर आणि डायबिटीस