advertisement

Home Hacks : 'या' 5 वस्तूंची असते एक्सपायरी डेट, जास्त काळ वापराल तर होईल मोठं नुकसान! ही चूक टाळा

Last Updated:
Do not use these 5 home items longer time : घरातील बऱ्याच अशा वस्तू असतात, ज्या आपण दीर्घकाळ वापरत राहतो. बहुतांश वस्तूंवर एक्सपायरी देत लिहिलेली असते. मात्र काही वस्तू अशा असतात, ज्यांच्यावर एक्सपायरी देत लिहिलेलीही नसते आणि त्या मुळातच एक्सपायरी होऊ शकतात असे आपल्याला वाटत नाही. पण अशा वाटू जास्त काळ वापरल्या तर आपले नुकसान होऊ शकते. चला पाहुयात त्या वस्तू कोणत्या आहेत.
1/5
बेडशीट्स : घरात वापरले जाणारे बेडशीट्स आणि चादरी आपण चांगल्या क्वालिटीचे घेतले असेल तर ते दीर्घकाळ टिकते. म्हणूनच त्याचा वापर वर्षानुवर्षे केला जातो. पण वारंवार धुतल्यानंतरही त्यात घाम, मृत त्वचा, शरीरातील तेल आणि धुळीचे कण जमा होऊ शकतात. म्हणून बेडशीट्स आणि चादरी 2-3 वर्षांत नक्की बदला.

2/5
पाण्याच्या बाटल्या : फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी हल्ली रियुजेबल पाण्याच्या बाटल्या वापरल्या जातात. त्याची विशिष्ठ एक्सपायरी डेट असते. म्हणून त्या लवकर घाण होतात. बाटल्यांचे झाकण किंवा स्ट्रॉमध्ये ओलावा अडकतो, ज्यामुळे त्यात बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्याची शक्यता असते. तुम्ही बॉटल्स रोज धूत असाल तरीही त्या 6 महिन्यांनी बदला.

3/5
सामानाची पिशवी : हल्ली प्लास्टिक पिशव्यांचा वापर लोक कमी करतात आणि त्याऐवजी कापडाच्या पिशव्या वापरतात. जे खरंच चांगले आहे. मात्र या कापडाच्या पिशव्याही तुम्ही काही अवताराने बदलल्या पाहिजे. कारण आपण बऱ्याचदा त्यात भाज्या आणतो, कधीतरी कच्चे मांस आणतो. नकळत याचे काही अवशेष त्या पिशव्यांमध्ये राहू शकतात. म्हणून पिशवीला वास येत असेल किंवा ती फाटू लागली तर लगेच बदला.

4/5
आइस ट्रे : घरात बऱ्याचदा फ्रिजसोबत आलेला आईस क्युब ट्रे वापरला जातो. किंवा आपण बाजारातून आणतो. मात्र त्याचा वापर तसा कमी असतो आणि ते प्लास्टिक असल्याने लवकर खराब होत नाही.म्हणून आपण तो लवकर बदलतही नाही. मात्र हे चुकीचे आहे. हा प्लास्टिक आइस ट्रे दर 2 वर्षांनी बदलायला हवा. कारण फ्रिजमध्येही त्यावर लहान भेगा आणि ओरखडे पडतात, ज्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशी वाढू शकते.

5/5
टॉवेल : अंघोळ केल्यानंतर आपण साहजिकतच टॉवेल वापरतो. बरेच लोक हा टॉवेल रोज धुतात किंवा काही लोक अवताराने धुतात. टॉवेल किती स्वच्छ वाटत असला तरी त्यामध्ये घाण आणि बॅक्टेरिया राहू शकतात. तुमच्या टॉवेललाला वास येत असेल तर किंवा नसेलही येत तरीही तो 2 वर्षांनी बदलणे आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement