advertisement

फिल्मसाठी कोट्यवधी फी, तरीही कर्ज फेडायला पैसे नाहीत? राजपाल यादवची प्रॉपर्टी पाहून पायाखालची जमीन सरकेल

Last Updated:
Rajpal Yadav Controversy: २०१० मध्ये घेतलेल्या एका कर्जाची परतफेड न करू शकल्याने राजपाल यादव सध्या दिल्लीच्या तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. मात्र, ते जेलमध्ये जाताच सोशल मीडियावर एका नवीन वादाला तोंड फुटलंय.
1/8
बॉलिवूडचे लाडके 'छोटा पंडित' म्हणजेच राजपाल यादव सध्या दिल्लीच्या तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. २०१० मध्ये घेतलेल्या एका कर्जाची परतफेड न करू शकल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे. मात्र, राजपाल जेलमध्ये जाताच सोशल मीडियावर एका नवीन वादाला तोंड फुटलंय.

2/8
प्रेक्षकांचा सवाल आहे की, जो अभिनेता वर्षाला कोट्यवधी रुपये कमावतो, ज्याच्याकडे लक्झरी गाड्या आहेत, तो ९ कोटींच्या कर्जासाठी जेलमध्ये कसा जाऊ शकतो? त्यांच्या संपत्तीचा आकडा समोर आल्यावर तर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

3/8
राजपाल यादव यांनी सरेंडर करण्यापूर्वी
राजपाल यादव यांनी सरेंडर करण्यापूर्वी "माझ्याकडे पैसे नाहीत" असं भावूक विधान केलं होतं. पण आकडेवारी काहीतरी वेगळंच सांगते. मिळालेल्या माहितीनुसार, राजपाल एका चित्रपटासाठी साधारणपणे १ ते २ कोटी रुपये मानधन घेतात. गेल्या काही वर्षांतील त्यांच्या मानधनाचा हिशोब पाहिला तर, 'भूल भुलैया २' या सुपरहिट सिनेमातील 'छोटा पंडित' साकारण्यासाठी त्यांनी तब्बल १.२५ कोटी रुपये घेतले होते.
advertisement
4/8
कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन' या सिनेमासाठी त्यांना साधारण २ कोटी रुपये मिळाल्याची चर्चा आहे. जाहिरातींमधून ते वर्षाला ३० ते ३५ लाख रुपये कमावतात. राजपाल यादव यांची एकूण संपत्ती पाहता, खरंच त्यांच्याकडे पैसे नाहीत का असा प्रश्न उभा राहिला आहे.

5/8
रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती ५० ते ८५ कोटी रुपयांच्या घरात असून त्यांच्याकडे ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या कार आहेत आणि रिअल इस्टेटमध्येही त्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. मग प्रश्न उरतो की, ५ कोटींचं मूळ कर्ज आणि वाढलेलं ९ कोटींचं देणं फेडण्यासाठी त्यांनी ही मालमत्ता का वापरली नाही?

6/8
कदाचित या मालमत्ता कायदेशीर कचाट्यात अडकल्या असाव्यात किंवा त्यांच्याकडे लिक्विड कॅश नसावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

7/8
राजपाल यादव जेलमध्ये असले तरी सिनेसृष्टीतील त्यांचे मित्र त्यांना विसरलेले नाहीत. सलमान खान, अजय देवगण, वरुण धवन आणि सोनू सूद यांसारख्या बड्या स्टार्सनी राजपाल यांना आर्थिक मदत देऊ केली आहे. या मदतीमुळे राजपाल यांचा कायदेशीर लढा सोपा होण्याची चिन्हं आहेत.

8/8
राजपाल यादव लवकरच पडद्यावर परतणार आहेत. जून २०२६ मध्ये त्यांचा मल्टीस्टारर 'वेलकम टू द जंगल' प्रदर्शित होत आहे, तर १० एप्रिल २०२६ रोजी अक्षय कुमारसोबतचा 'भूत बंगला' प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमांमधून मिळणाऱ्या मानधनातून ते आपली आर्थिक परिस्थिती सावरू शकतील, अशी अपेक्षा आहे.

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement