advertisement

दादांचा घात की अपघात? लोकांच्या मनात शंकांचं काहूर, तटकरे-प्रफुल पटेल गप्प का? कराळे मास्तरांचा सवाल

Last Updated:

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात नव्हे तर घातपात झाला आहे, अशी दाट शंका रोहित पवार यांना आहे.

नितेश कराळे-सुनील तटकरे-प्रफुल पटेल
नितेश कराळे-सुनील तटकरे-प्रफुल पटेल
गोविंद वाकडे, प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन अपघात नसून घातपाताने झाल्याची शंका आम्ही पक्षातील नेते, पदाधिकारी उपस्थित करीत आहोत, त्यासंदर्भाने मुद्दे मांडत आहेत, मात्र याबाबत अजित पवार यांचे अतिशय निकटवर्यती असलेले प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे का बोलत नाहीत? असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रवक्ते नितेश कराळे मास्तर यांनी उपस्थित केलाय.
अजित पवार यांच्या विमानाचा अपघात नव्हे तर घातपात झाला आहे, अशी दाट शंका रोहित पवार यांना आहे. अपघाताची चौकशी सीआयडीद्वारे न करता डीजीसीएसह परदेशातील अनुभवी संस्थांकडून करावी, अशी त्यांची मागणी आहे. यासंदर्भाने त्यांनी खळबळजनक दावे करणारी पत्रकार परिषदही मंगळवारी घेतली. अजित पवार यांच्यासोबत विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेली पिंकी माळी हिचे वडीलही हा अपघात नसल्याचे म्हणत आहेत. हेच संदर्भ देऊन कराळे मास्तरांनी तटकरे-पटेलांना सवाल विचारले.
advertisement

अजित पवार यांच्या अपघातामागे आंतरराष्ट्रीय ताकदींचा हात?

शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी नितेश कराळे मास्तर पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपले मत मांडत अजित पवार यांच्या अपघातात आंतरराष्ट्रीय ताकदींचा हात असण्याची शक्यता देखील व्यक्त केली आहे.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची सुरू असतानाच अजितदादांचा अपघात कसा?

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना अजितदादांचे अपघाती निधन होणे यावर देखील नितेश कराळे यांनी शंका उपस्थित केली. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असताना नेमका त्याचवेळी अजित पवार यांचा अपघात न पटणारा आहे, असे कराळे म्हणाले. दरम्यान, शरद पवार आपली पुरोगामी भूमिका सोडायला तयार नसल्याने विलिनीकरणाची चर्चा थांबली असावी, असे देखील कराळे मास्तर म्हणाले.
advertisement

सुनील तटकरे काय म्हणाले?

दुसरीकडे सुनील तटकरे यांना अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीच्या अनुषंगाने प्रश्न विचारला. त्यावर अपघाताचे सत्य देशासमोर आले पाहिजे, सखोल चौकशी व्हावी हीच आमची भूमिका असल्याचे तटकरे म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दादांचा घात की अपघात? लोकांच्या मनात शंकांचं काहूर, तटकरे-प्रफुल पटेल गप्प का? कराळे मास्तरांचा सवाल
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement