Methi Water Health Benefits: 1 महिना प्या मेथीचं पाणी, होतील इतके फायदे की विश्वास बसणार नाही
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Methi Water Health Benefits in Marathi: औषधी गुणधर्मांमुळे मेथीचा अनेकांगी फायदा शरीराला होऊ शकतो. तुम्ही जर फक्त 1 महिना 1 ग्लास पाण्यात मेथीच्या बिया भिजवून ते पाणी प्यायलात तर तुम्हाला इतके फायदे होतील की तुमचा विश्वास बसणार नाही.
Methi Water Benefits: मेथीच्या बियांचा सर्वसामान्यपणे वापर हा जेवणात आणि मसाल्यांमध्ये होतो. मात्र मेथीत असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे मेथीचा अनेकांगी फायदा शरीराला होऊ शकतो. तुम्ही जर फक्त 1 महिना 1 ग्लास पाण्यात मेथीच्या बिया भिजवून ते पाणी प्यायलात तर तुम्हाला इतके फायदे होतील की तुमचा विश्वास बसणार नाही.
रिकाम्या पोटी मेथी पाणी पिण्याचे फायदे नेमके काय आणि किती फायदे आहेत ते जाणून घेऊयात.

पचनासाठी फायदेशीर
मेथीमध्ये फायबरचं हे चांगल्या प्रमाणात आढळून येतात. मेथीच्या पाण्यामुळे शरीरारत फायबर्सची मात्रा वाढत असल्याने अपचन, गॅसेस आणि बद्धकोष्ठता यासारख्या पचनासंदर्भातल्या आजारांवर मेथीचं पाणी पिणे फायदेशीर ठरू शकतं. याशिवाय, मेथीचे पाणी पोषकतत्वं आपल्या शरीरात शोसून घ्यायला मदत करतात.
advertisement
वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत
मेथीचं पाणी भूक प्यायल्याने पोट भरलेलं राहतं. त्यामुळे भूक कमी लागून अतिरिक्त कॅलरीज पोटात जाण्यापासून वाचतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहायला देखील मदत होते.
हृदयरोग्यांसाठी वरदान
मेथीच्या पाण्याच्या नियमित सेवनाने रक्तातलं खराब कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते. एकूणच कोलेस्टेरॉल कमी झाल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हृदयविकारांचा धोका कमी होतो.
advertisement
डायबिटीसच्या आणि सांधेदुखीवर रामबाण उपाय
मेथीचं पाणी रक्तातील साखरे नियंत्रणात ठेवते. त्यामुळे मधुमेहासारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी मेथीचं पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मेथीच्या पाण्यात संयुगे असतात जी संधिवात आणि दमा यासारख्या आरोग्याच्या स्थितीसाठी फायदेशीर ठरू शकतात.
मेथीचं पाणी प्यायल्याने शरीरात हार्मोन्स व्यवस्थित तयार होत राहातात. त्यामुळे अनियमित मासिक पाळीचा त्रास असणाऱ्या महिलांनी मेथीचं पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2024 6:59 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Methi Water Health Benefits: 1 महिना प्या मेथीचं पाणी, होतील इतके फायदे की विश्वास बसणार नाही