Winter Care Tips: त्वचेसाठी महत्त्वाचं आहे ई व्हिटॅमिन, हिवाळ्यात आहारात करा आवश्यक बदल

Last Updated:

Winter Care Tips in Marathi: हिवाळ्यात त्वचा कोरडी होते, आणि त्वचेला तडे जातात, या गोष्टी टाळण्यासाठी आहारात बदल करणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन ई च्या कमतरतेची लक्षणं, आणि आहार कसा असावा याविषयीची माहिती.

Winter Care Tips: त्वचेसाठी महत्त्वाचं आहे ई व्हिटॅमिन, हिवाळ्यात आहारात करा आवश्यक बदल
Winter Care Tips: त्वचेसाठी महत्त्वाचं आहे ई व्हिटॅमिन, हिवाळ्यात आहारात करा आवश्यक बदल
मुंबई : हिवाळ्यात त्वचा कोरडी होते, आणि त्वचेला तडे जातात, या गोष्टी टाळण्यासाठी काय करावं याविषयीची माहिती. हिवाळ्यात, जेव्हा शरीरातील ई जीवनसत्वाचं प्रमाण कमी होतं, तेव्हा त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्याची क्षमता कमकुवत होऊ लागते आणि त्वचा कोरडी, खरखरीत होते आणि भेगा पडायला सुरुवात होते.
थंडीच्या दिवसात आपली त्वचा आर्द्रता गमावू लागते आणि कोरडी होते. याचे मुख्य कारण केवळ वातावरण बदल नाही तर जीवनसत्त्वांचा अभाव हे देखील असू शकतं. विशेषतः व्हिटॅमिन ईच्या कमतरतेचा हिवाळ्यात त्वचेवर खोलवर परिणाम होतो. जर हिवाळ्याच्या आगमनासोबत तुमची त्वचा कोरडी होऊ लागली तर तुमच्या शरीरात या जीवनसत्वाची कमतरता असू शकते.
Skin Care Tips: हिवाळ्यात घ्या चेहऱ्याची काळजी, कोरड्या त्वचेसाठी वापरा घरातलं मॉईश्चरायजर
व्हिटॅमिन ई एक अँटिऑक्सिडेंट आहे, जे आपली त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी, आणि बाहेरच्या नुकसानापासून
advertisement
संरक्षण करण्यासाठी आणि त्वचेची आर्द्रता राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. हे त्वचेच्या पेशींचे पोषण करतं,
त्वचा मऊ ठेवण्यासाठीही उपयुक्त आहे.

व्हिटॅमिन ईच्या कमतरतेची लक्षणं -

  • त्वचा जास्त कोरडी होणं
  • विशेषत: ओठ आणि टाचांवरची त्वचा तडकणं
  • त्वचेवर लालसरपणा आणि जळजळ
  • त्वचेवर खाज येणं आणि खेचल्यासारखी वाटणं
  • त्वचा निस्तेज दिसणं

व्हिटॅमिन ईच्या कमतरतेवर मात कशी करावी?

advertisement
  • बदाम, शेंगदाणे आणि अक्रोडचा आहारात समावेश करा.
  • सूर्यफूल बिया, भोपळ्याच्या बिया खा.
पालक, ब्रोकोली सारख्या हिरव्या पालेभाज्या खा.
एवोकॅडो, ऑलिव्ह ऑईल आणि सोयाबीन तेलचा वापर करा.
पूरक आहार घ्या.

त्वचेची काळजी घेण्यासाठी व्हिटॅमिन ईचा उपयोग कसा करावा ?

  • व्हिटॅमिन ई असलेली मॉइश्चरायझर्स आणि क्रीम वापरा. व्हिटॅमिन ई तेल थेट त्वचेवर लावल्यानं त्वचेला आराम मिळतो आणि त्वचेतला ओलावा टिकून राहतो.
  • तब्येतीसाठी जीवनसत्त्वं आणि खनिजं देखील महत्वाची आहेत, व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे त्वचेला तडे जातात पण त्याचबरोबर व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि झिंक यांसारखे इतर पोषक घटक देखील त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे संतुलित आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे.
  • हिवाळ्यात त्वचेला तडे जाणे ही एक सामान्य समस्या असू शकते, परंतु ती हलक्यात घेऊ नका. खाण्याच्या योग्य सवयी आणि योग्य काळजी घेतली तर व्हिटॅमिन ईच्या कमतरतेवर मात करून तुमची त्वचा निरोगी आणि मुलायम होऊ शकते. ही समस्या गंभीर होत असेल तर नक्कीच एखाद्या तज्ज्ञाशी संपर्क साधा.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Winter Care Tips: त्वचेसाठी महत्त्वाचं आहे ई व्हिटॅमिन, हिवाळ्यात आहारात करा आवश्यक बदल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement