Skin Care Tips: हिवाळ्यात घ्या चेहऱ्याची काळजी, कोरड्या त्वचेसाठी वापरा घरातलं मॉईश्चरायजर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
Skin Care Tips in Marathi: हिवाळ्यात कोरड्या होत असलेल्या त्वचेसाठी साय किंवा मलई हे एक चांगलं मॉईश्चरायजर आहे. साय नुसतीही लावता येते आणि केळी, बेसन, मध वापरुनही फेसपॅक चेहऱ्याला लावता येईल.
Skin Care Tips: हिवाळा सुरु झालाय आणि आता त्वचा कोरडी व्हायला सुरुवात होईल. पण यासाठी कोणतंही क्रिम बाहेरुन आणण्यापेक्षा, घरातलं एक मॉईश्चरायजर नक्की वापरुन पाहा. हे मॉईश्चरायजर म्हणजे साय. हिवाळ्यात चेहऱ्यावर साय लावता येईल, यामुळे त्वचा मुलायम होईल. दुधावाटे साय खाल्ली जातेच पण ती त्वचेची काळजी घेण्यासाठीही महत्त्वाची आहे. स्वयंपाकघरातील मसालेच नाही तर दुधाची साय देखील त्वचेची काळजी घेण्यासाठी वापरली जाते. सायीच्या वापरामुळे त्वचेला आवश्यक ओलावा मिळतो, यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी निघून जातात, ज्यामुळे घाण कमी होते आणि त्वचा चमकदार होते.
याशिवाय टॅनिंग कमी करण्यासाठीही साय वापरली जाते. साय चेहऱ्यावर नुसती लावता येते तसंच त्यापासून वेगवेगळे फेस पॅक देखील बनवता येतात. हे फेस पॅक बनवायला सोपे आहेत. या दिवसात तुमची त्वचा कोरडी होत असेल साय कशी वापरता येईल पाहूया.
advertisement
साय आणि केळी
साय आणि केळी हा फेस पॅक त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. यामुळे त्वचेवर साचलेली घाण निघून जाते आणि खडबडीत झालेली त्वचा मुलायम होते. हा फेस पॅक बनवण्यासाठी केळ्यामध्ये २ चमचे साय मिसळा आणि कुस्करुन घ्या. हे मिश्रण संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावा. हे लावल्यानंतर आणि 20 ते 25 मिनिटं ठेवा, नंतर, चेहरा धुवा आणि स्वच्छ करा.
advertisement
साय आणि मध
advertisement
हा फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात 2 चमचे साय घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला. आता त्यात एक
चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करून मिश्रण बनवा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. सर्वप्रथम चेहरा पाण्यानं धुवून स्वच्छ करा. आता हा फेस पॅक लावा आणि 10 ते 15 मिनिटं ठेवल्यानंतर चेहरा धुवून स्वच्छ करा.
advertisement
साय आणि बेसन
चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी हा फेस पॅक तयार करा. या फेस पॅकसाठी एक चमचा बेसन एक चमचा सायीमध्ये घालून मिक्स करा. हा फेस पॅक 15 मिनिटं चेहऱ्यावर ठेवा. बेसन आणि सायीची पेस्ट खूप घट्ट असेल तर त्यात थोडं दूध घाला. हा फेस पॅक आठवड्यातून एकदा 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावता येतो.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2024 6:22 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Skin Care Tips: हिवाळ्यात घ्या चेहऱ्याची काळजी, कोरड्या त्वचेसाठी वापरा घरातलं मॉईश्चरायजर