Diabetes Symptoms in Females: महिलांनो स्वत:ला डायबिटीस पासून जपा, ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरीत घ्या डॉक्टरांचा सल्ला
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Diabetes Symptoms in Females: गेल्या काही वर्षात अनेक महिलांना, तरूणींना डायबिटीसची लागण झालीये. मात्र महिलांमध्ये दिसून आलेली लक्षणं ही पुरूषांपेक्षा वेगळी होती. त्यामुळे आम्ही ज्या लक्षणांची माहिती इथे देत आहोत, ती लक्षणं जर तुमच्यात दिसून आली तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मुंबई : काही वर्षांपूर्वीपर्यंत डायबिटीस हा वृद्ध व्यक्तींना होत होता. अनुवंशिकतेमुळे होणारा आजार अशी डायबिटीसची ओळख होती. मात्र गेल्या काही वर्षात बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक तरूणांना डायबिटीसची लागण झालीये. फक्त अनुवंशिकच नाही तर लाईफस्टाईल डिसीज अशी डायबिटीसची नवी ओळख झालीये. डायबिटीसकडे दुर्लक्ष केलं तर हार्ट ॲटॅक, ब्रेन स्ट्रोकसारख्या गंभीर परीणामांना सामोरं जावं लागेल. वारंवार तहान लागणे, अचानक वजन कमी होणं, सुदृढ डोळ्यांमध्ये अचानक दृष्टीदोष येणं ही डायबिटीसची पुरूषांमध्ये दिसणारी काही लक्षणं. मात्र गेल्या काही वर्षात अनेक महिलांना, तरूणींना डायबिटीसची लागण झालीये. मात्र महिलांमध्ये दिसून आलेली लक्षणं ही पुरूषांपेक्षा वेगळी होती. त्यामुळे आम्ही ज्या लक्षणांची माहिती इथे देत आहोत, ती लक्षणं जर तुमच्यात दिसून आली तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
महिलांना डायबिटीस झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे
यीस्ट संसर्ग
हा एक त्वचा रोग असून जेव्हा यीस्टच्या संसर्ग होतो तेव्हा रक्तातील साखर वाढते. अंगाला प्रचंड खाज येतो. अंगावर पांढरे ठिपके सुद्धा दिसून येतात. कधी कधी सतत खाज आल्यामुळे त्वचा लाल पडते. मुळातच पुरूषांपेक्षा हा संसर्ग महिलांना होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे जर महिलांना अचानक असा काही त्रास झाल्यास त्यांनी त्वचारोग तज्ज्ञांकडे जाऊन त्वरीत उपचार सुरू करावेत. मात्र त्याच बरोबर फिजिशिएनची भेट घेऊन डायबिटीसची तपासणी करून घ्यावी.
advertisement
पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोम (PCOS)
पीसीओएस हा आजकाल महिलांमध्ये सर्वात सामान्य आजारांपैकी एक आहे. हे डायबिटीसचंही लक्षण आहे. पी. सी. ओ. एस. ने ग्रस्त असलेल्या स्त्रियांमध्ये सामान्यतः इन्सुलिनचे संतुलन बिघडते, ज्यामुळे टाइप-2 डायबिटीस होऊ शकतो. सामान्य लक्षणांमध्ये अनियमित मासिक पाळी, जास्त वजन वाढणं अशा लक्षणांचा समावेश होतो.
युटीआय (UTI)
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, महिलांना यू. टी. आय. सारख्या संसर्गाचा अधिक धोका असतो. लघवीच्या वेळी जळजळ होणे, वारंवार लघवी होणे आणि मळमळ होणे ही लक्षणे आहेत.
advertisement
गर्भधारणेदरम्यान (During Pregnancy)
काही स्त्रियांमध्ये गरोदरपणात मधुमेहाची लक्षणेही दिसून येतात. हार्मोनच्या असंतुलनामुळे इन्सुलिनच्या कार्यावरही परिणाम होतो. गरोदरपणातील मधुमेह असलेल्या महिलांना नंतरच्या आयुष्यात टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो.
advertisement
हात-पायांना मुंग्या येणे, त्वचा काळी पडणे किंवा त्वचेवर (मानेभोवती किंवा बगलेत) डाग पडणे. अशी लक्षणे जर महिलांनामध्ये दिसून आली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2024 6:56 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diabetes Symptoms in Females: महिलांनो स्वत:ला डायबिटीस पासून जपा, ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरीत घ्या डॉक्टरांचा सल्ला