आता सध्या सोशल मीडियावर तुम्हाला बेसनच्या लाडूचे बरेच व्हिडीओ दिसतील. बहुतेक व्हिडीओ लाडू कसे बनवायचे, गोल कसे करायते, परफेक्ट प्रमाण किती असावं यावर असतील. एकंदर तर काय तर लाडूची रेसिपी. पण हे बनवलेले लाडू खाताना टाळूला चिकटण्यावर उपाय मात्र तुम्हाला कुणी सांगणार नाही.
advertisement
बेसनचा लाडू टाळूला चिकटला की तुम्ही काय करता तर पाणी पिता, तरीसुद्धा कधीकधी टाळूला चिकटलेला हा लाडू लगेच निघत नाही. पण यासाठी लाडू बनवण्याची पद्धत बदला. म्हणजे लाडू बनवताना अशा पद्धतीने बनवा की तो टाळूला चिकटणारच नाही. आता टाळूला न चिकटणारा लाडू कसा बनवायचा? ते पाहुयात.
लाडूसाठी बेसन बनवण्यासाठी जी चण्याची डाळ तुम्ही घेणार आहात, ती भाजून दळल्यानंतर थोडी रवाळ दळायची एकदम बारीक नाही. रवाळ दळल्याने ते लाडू चिकट होत नाहीत, टाळ्याला चिकटत नाहीत. अशी टिप Sarita's Kitchen या युट्युब चॅनेलवर शेअर करण्यात आली आहे.
1 किलो बेसन लाडूसाठी प्रमाण
हरभरा डाळ किंवा बेसन 1 किलो
साजूक तूप 150-200 ग्राम
पिठी साखर 400 ग्राम
वेलची पूड 1 टीस्पून
पाणी / दूध 3-4 टेबलस्पून
पिस्ते, बेसन आवडीप्रमाणे
वाटीचं प्रमाण
बेसन 4 वाटी
पातळ केलेले साजूक तूप पाऊण वाटी + 2 टेबलस्पून
पिठी साखर 2 वाटी
वेलची पूड 1 टीस्पून
पाणी / दूध 3-4 टेबलस्पून
पिस्ते, बेसन आवडीप्रमाणे
बेसन लाडू पीठ कृती
चण्याची डाळ अगदी आचेवर हलके डाग येईपर्यंत वाळवा भाजून घ्या. एकदा तयार झाल्यावर, डाळ रूम टेम्प्रेचरवर येऊ द्या आणि नंतर ते पीठ गिरणीत दळायला द्या. थोडेसे जाडसर पीठ बनवा, जे लाडूसाठी योग्य आहे
बेसन लाडू कृती
कढईत थोडं तूप गरम करा, बेसन घाला आणि मंद आचेवर 2-3 मिनिटं भाजून घ्या. नंतर आणखी थोडं बेसन घाला आणि आणखी 2 मिनिटं भाजून घ्या, पुन्हा उरलेलं बेसन घाला आणि बेसनचा रंग हलका सोनेरी तपकिरी होईपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या. बेसन भाजताना विस्तव कमी ठेवा, सतत भाजून घ्या आणि बेसनचे सर्व गुठळे फोडत राहा.
25 मिनिटं भाजल्यानंतर जर तुम्हाला बेसन अजूनही कोरडं आढळलं तर थोडं जास्त तूप घाला. बेसन पूर्णपणे भाजल्यानंतर थोडं पाणी किंवा दूध शिंपडा आणि 2 मिनिटं चांगलं मिसळा आणि गॅस बंद करा. भाजलेलं बेसन थंड करून घ्या. नंतर त्यात पावडर साखर आणि वेलची घाला. सर्वकाही चांगलं मिक्स करा, साखरेच्या गुठळ्या असल्यास मोडून घ्या आणि लाडू वळा.