Indian Railway : ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळं FREE, चवही भारी! महाराष्ट्रातून सुटणारी भारतातील एकमेव ट्रेन; लगेच नोट करा नाव, स्टेशन, वेळ
- Published by:Priya Lad
Last Updated:
Indian Railway : भारतातील एकमेव ट्रेन ज्यात ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत सगळं मोफत मिळतं. फक्त ट्रेनचं तिकीटच घ्यावं लागतं. ही अशी देशातील एकमेव ट्रेन आहे आणि ती महाराष्ट्रातूनच सुटते.
किती तरी लोक ट्रेनने प्रवास करतात आणि या प्रवासात ट्रेनचं खायचं म्हटलं की त्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतात. शिवाय कित्येक प्रवाशांची तक्रार असते हे जेवण निकृष्ट दर्जाचं असतं. पण भारतातील एक अशी एकमेव ट्रेन ज्यात ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत सगळं फ्री मिळतं. मोफत असलं तरी हे जेवण इतकं चविष्ट असतं की बोटं चाटून खाल.
advertisement
advertisement
advertisement
भारतीय रेल्वेचे माहिती आणि प्रसिद्धी विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी सांगितलं की या ट्रेनमध्ये मिळणाऱ्या मोफत जेवणाचा रेल्वेशी काहीही संबंध नाही. हे जेवण गुरुद्वारांकडून मिळणाऱ्या देणग्यांमधून तयार केलं जातं. जर कोणी स्वेच्छेने प्रवाशांना जेवण देऊ इच्छित असेल तर भारतीय रेल्वेला कोणताही आक्षेप नाही.
advertisement
advertisement
advertisement