नीरज राठौर, जे गेल्या 14 वर्षांपासून गुरुमॅक्स या नावाने कूलर बनवून विकतात, त्यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले की, कूलरमधून वास येण्याची अनेक कारणं असू शकतात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यात वापरलेलं गवत किंवा हनीकॉम्ब पॅड. बाजारात दोन ते तीन प्रकारचं गवत आणि हनीकॉम्ब उपलब्ध आहे. फिकट पिवळ्या रंगाच्या गवताची गुणवत्ता कमी असते आणि ते स्वस्तही मिळतं. तर, फिकट लाल रंगाचं गवत चांगल्या प्रतीचं मानलं जातं. हे गवत चिनारच्या झाडापासून बनवलेलं असतं, ज्याला वास येत नाही, उलट चांगला सुगंध येतो.
advertisement
कूलरला वास का येतो?
जर कमी प्रतीचं गवत किंवा हनीकॉम्ब वापरलं गेलं, तर त्यातून वास येण्याची शक्यता असते. याशिवाय, कूलरची टाकी बऱ्याच दिवसांपासून साफ न केल्यासही वास येऊ शकतो. कारण टाकीत काही प्रमाणात पाणी साचून राहतं, ज्यामुळे दुर्गंधी येण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगल्या प्रतीचा कूलर खरेदी करणं सर्वात महत्त्वाचं आहे, कारण त्यात वापरलेलं गवत किंवा हनीकॉम्ब कूलिंग पॅड प्रयोगशाळेत तपासलेलं असतं.
चांगल्या प्रतीचं गवत किंवा हनीकॉम्ब लावा
टाकी वेळोवेळी साफ करा. चांगल्या प्रतीचं गवत किंवा हनीकॉम्ब कूलिंग पॅड वापरा. जर तुम्ही जुन्या कूलरमध्ये गवत किंवा हनीकॉम्ब पॅड बदलत असाल, तर त्याच्या गुणवत्तेची विशेष काळजी घ्या. कूलर नेहमी खिडकीजवळ किंवा अशा ठिकाणी ठेवा, जिथे कूलर बाहेरची ताजी हवा शोषू शकेल आणि गरम हवा बाहेर टाकू शकेल.
कूलर खस परफ्यूमचा वापर करा
नीरज सांगतात की, हे सर्व घरगुती उपाय करूनही जर कूलर चालू केल्यावर वास येत असेल, तर हा वास घालवण्यासाठी आणखी एक उत्तम आणि टिकाऊ पर्याय आहे. बाजारात कूलर खस नावाचं परफ्यूम उपलब्ध आहे, जे जास्त महागही नाही. ते गुणवत्तेनुसार वेगवेगळ्या दरात मिळतं. गरजेनुसार ते कूलरच्या टाकीत टाका, जेव्हा तुम्ही कूलर चालू कराल, तेव्हा तुमच्या संपूर्ण घरात हवेसोबत सुगंध दरवळेल.
हे ही वाचा : उन्हाळ्यात शरीराचं सुरक्षा कवच आहे 'हा' पदार्थ, दिवसभर रहाल थंडगार, फायदे आहेत भरपूर
हे ही वाचा : Success Story : घरात सुरू केलं 'हे' छोटंसं काम, आज बनली बिझनेस वुमेन; वर्षाला कमवतीय 40 लाख