अगदी कॅन्सरमुळेही शरीरात जास्त घाम येऊ शकतो. शरीरात जास्त घाम येणे या आजाराला हायपरहायड्रोसिस म्हणतात. मात्र, अति उष्णतेमुळे किंवा अतिव्यायाममुळे येत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. पण जर तुम्हाला इतका घाम येत असेल की, तुमचे कपडे ओले होत असतील आणि तुम्हाला ते तुमच्या हातांनी पुसावे लागत असतील, तर ही बाब चिंताजनक आहे.
advertisement
रात्री झोपण्याच्या किती वेळ आधी पाणी प्यावं? पाण्याबाबतचे हे नियम तुम्हाला माहित हवेच..
अति घामाचे दुष्परिणाम..
शरीराला थंड राहावे यासाठी आपल्या शरीरातून घाम बाहेर येतो. जेव्हा शरीराचे तापमान वाढते तेव्हा मज्जासंस्था आपोआप घाम ग्रंथींना घाम निर्माण करण्याचा संदेश देते. आजारपणामुळे या मज्जातंतूमध्ये समस्या निर्माण होते, ज्यामुळे घामाच्या ग्रंथींमधून जास्त घाम येऊ लागतो. याला अनेक रोग कारणीभूत ठरू शकतात. जर मधुमेह असेल तर अशा स्थितीत या नसांना इजा होऊ शकते. याशिवाय, स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर ते हॉट फ्लॅशच्या स्वरूपात देखील दिसू शकते. याशिवाय काही कॅन्सर, थायरॉइडची समस्या, मज्जासंस्था बिघडणे आणि संसर्ग झाल्यास जास्त घाम येऊ शकतो.
कधी ठरू शकते जास्त घातक?
जास्त घाम आल्याने तुमचा दिवस खराब होत असेल आणि तुमच्या दिनचर्येवर परिणाम होत असेल तर त्याला हलक्यात घेऊ नका. असे झाल्यास डॉक्टरकडे जा. तुम्हाला सामान्य दिवसांपेक्षा जास्त घाम येतो आणि रात्रीही घाम येणे थांबत नाही, अशा परिस्थितीत तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल पाहणं पडेल महाग, जाऊ शकतात डोळे! वाचा दुष्परिणाम
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
