Health Tips : रात्री झोपण्याच्या किती वेळ आधी पाणी प्यावं? पाण्याबाबतचे हे नियम तुम्हाला माहित हवेच..
- Published by:Pooja Jagtap
- trending desk
Last Updated:
आरोग्याच्या दृष्टीनं पाणी पिण्याचे काही नियम सांगितले गेले आहेत. काही व्यक्ती रात्री झोपण्यापूर्वी पाणी पितात. पण रात्रीच्या वेळी पाणी पिताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
मुंबई : उत्तम आरोग्यासाठी जसा पोषक आहार आणि पुरेसा व्यायाम गरजेचा आहे, तसं दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी पिणं देखील आवश्यक आहे. पण आरोग्याच्या दृष्टीनं पाणी पिण्याचे काही नियम सांगितले गेले आहेत. काही व्यक्ती रात्री झोपण्यापूर्वी पाणी पितात. पण रात्रीच्या वेळी पाणी पिताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे पोटाच्या आरोग्यावर आणि झोपेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती, रात्रीच्या वेळी किती प्रमाणात पाणी प्यावं या बाबत सविस्तर जाणून घेऊया.
पाणी पिणं हे काही काम किंवा कौशल्य नाही. पाणी कसं प्यावं हे कोणाला शिकवावं लागत नाही. प्रत्येक जण पाणी कसं प्यावं हे आपोआपच शिकतो. पाण्यामुळे शरीरावर प्रतिकूल आणि अनुकूल परिणाम होतो. योग्य वेळी पुरेसं पाणी प्यायलं नाही तर तब्येत बिघडू शकते. रात्रीच्या वेळी आपण किती प्रमाणात पाणी पितो याकडे लक्ष दिलं नाही तर आरोग्यावर परिणाम होतो आणि झोपेचं गणित देखील बिघडतं. त्यामुळे पाणी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत माहिती हवी.
advertisement
शरीर जर हायड्रेटेड असेल तर आरोग्य चांगले राहते. जर तुम्हाला रात्रीच्या वेळी जास्त तहान लागल्यासारखं वाटत असेल किंवा तुम्ही घाम जास्त येणाऱ्या ठिकाणी झोपत असाल तर अशावेळी झोपण्यापूर्वी काही वेळ पाणी पिऊ शकता. तुम्ही जर पाणी पिणं टाळलं तर आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
advertisement
पाणी पिण्याच्या वेळेचा झोप आणि युरिनरी सायकलवर परिणाम होत असतो. रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिण्याची योग्य वेळ म्हणजे जेवणापूर्वी अर्धा तास होय. ही वेळ सर्वोत्तम मानली जाते. पण जर तुम्ही जेवल्यानंतर दीड ते दोन तासांनी झोपणार असाल तर ही वेळ योग्य ठरते. रात्री झोपताना एकदम पाणी पिणं अयोग्य असल्याचं मानलं जातं. झोप मोडू म्हणून झोपण्याआधी दीड तास पाणी प्यावं.
advertisement
एकदम थंडगार पाणी पिणं टाळावं. कारण थंड पाणी आरोग्यासाठी प्रतिकूल ठरू शकतं. त्याऐवजी रात्रीच्या वेळी कोमट पाणी प्यायल्यास शरीर डिटॉक्स होतं. शरीरात साठलेले विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी कोमट पाणी पिणं फायदेशीर ठरतं.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 24, 2024 4:56 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : रात्री झोपण्याच्या किती वेळ आधी पाणी प्यावं? पाण्याबाबतचे हे नियम तुम्हाला माहित हवेच..






