Health Tips : दुपारी जेवल्यानंतर थकवा का जाणवतो? आहारतज्ञांनी सांगितलं कारण आणि उपाय
- Published by:Pooja Jagtap
- trending desk
Last Updated:
काही लोकांना दुपारच्या जेवणानंतर झोप येते, ऑफिसमध्ये आपण झोपू शकत नाही, त्यामुळे आळस येतो, कामात लक्ष लागत नाही किंवा डोकेदुखी होते. तसंच थकल्यासारखं वाटतं. मात्र असं का होतं. चला जाणून घेऊया.
मुंबई : काही जणांना दुपारच्या जेवणानंतर झोप येते, ऑफिसमध्ये आपण झोपू शकत नाही, त्यामुळे आळस येतो, कामात लक्ष लागत नाही किंवा डोकेदुखी होते. तसंच थकल्यासारखं वाटतं. काही जण अशा वेळी कॉफी पितात, जेणेकरून किमान झोप तरी लागणार नाही; पण असं केल्याने शरारातल्या कॅफिनचं प्रमाण खूप वाढतं. परिणामी रात्री झोप लागत नाही, असं कॅलिफोर्नियातल्या डेव्हिसमधले न्यूट्रिशनिस्ट डॉ. क्रिस्टोफर रोड्स यांनी सांगितलं. त्यांनी काही उपाय सांगितले आहेत. त्यामुळे दुपारी येणाऱ्या अशक्तपणापासून सुटका मिळेल.
1. प्रमाणात जेवावं
रोड्स म्हणाले, 'दिवसभर सारखं काही ना काही खात राहिल्याने झोप येऊ शकते आणि रक्तातली साखर विनाकारण वाढू शकते. स्नॅक्समुळे आपली भूक भागत नाही. स्नॅक्स चवीला चांगले असतात; पण त्याने पोट भरत नाही. अशी अनेक स्नॅक्स आहेत, ज्यामध्ये काही असे पदार्थ टाकले जातात, जे जास्त खाण्यास भाग पाडतात. त्यामुळे सतत काही तरी खाणं टाळावं.'
advertisement
2. साखरेचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाणं टाळा
रोड्स म्हणाले, 'तुम्ही दिवसभर ग्लुकोज नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही रोज जे गोड खाता ते शरीर ग्लुकोजच्या रूपात स्टोअर करतं आणि एनर्जी देतं. त्यामुळे तुमची ग्लुकोज लेव्हल हाय असेल तर तुम्हाला थकवा व अशक्तपणा जाणवणार नाही. म्हणून रक्तातील ग्लुकोज जास्त किंवा कमी नसावं, संतुलित असावं.'
advertisement
3. कॉफी घेणं बंद करा
रोड्स यांच्या मते, झोप आली की लोक कॉफी पितात; पण असं करू नये. कॉफीत साखर मिसळल्याने ग्लुकोज वाढतं. साखरेप्रमाणे कॅफिन इन्स्टंट एनर्जी देतं; पण त्यामुळे सुस्ती येते. कॉफीऐवजी ग्रीन टी पिणं चांगलं ठरतं, कारण त्यात कॅफीनसह अँटीऑक्सिडंट व एल-थेनाइनसारखे घटक असतात. एल-थेनाइन हे अमिनो अॅसिड आहे. ते ताण, निद्रानाश आणि चिंता कमी करण्यास मदत करतं.
advertisement
4. दुपारी पौष्टिक जेवा
दुपारचं जेवण कमी कार्ब असलेलं बनवा. त्यात प्रोटीन आणि भाज्यांचा समावेश करा, असा सल्ला रोड्स यांनी दिलाय. कार्बोहायड्रेट्समुळे तुम्हाला लगेच एनर्जी मिळेल व त्यामुळे ग्लुकोज वाढू शकते. म्हणून, दुपारचं जेवण पौष्टिक बनवा. त्यामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश असावा. फक्त हाय कार्ब असलेलं नाही तर प्रोटीन, फॅट, फायबर व कार्ब असलेला संतुलित आहार घ्या.
advertisement
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 23, 2024 4:40 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : दुपारी जेवल्यानंतर थकवा का जाणवतो? आहारतज्ञांनी सांगितलं कारण आणि उपाय






