advertisement

भोंदूबाबा खरात प्रकरणातील पीडित महिलांचे वकील काय म्हणाले? न्यायालयात काय घडलं?

Last Updated:

भोंदूगिरी, फसवणूक आणि महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये अटक करण्यात आलेल्या अशोक खरातला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अशोक खरात
अशोक खरात
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी, नशिक : महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाला अधिक कालावधीची गरज असल्याचा सरकारी पक्षाचा युक्तिवाद नाशिक जिल्हा न्यायालयाने मान्य केल्याने खरातचा पोलीस कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला आहे. खरात याची पोलीस कोठडी एक एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.
भोंदूगिरी, फसवणूक आणि महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये अटक करण्यात आलेल्या अशोक खरातची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर केले होते. यावेळी सरकारी वकिलांनी, आरोपी मास्टरमाईंड आहे. तपासात सहकार्य करत नाही. जंगम मालमत्ता आहे, त्याचा तपास करायचा आहे. तसेच पीडितांच्या पाण्यात नेमकं काय मिसळून द्यायचा, हे अद्याप त्याने सांगितले नसून गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले.
advertisement

अशोक खरातने अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले

पीडित महिला समोर येत असल्याने तपासाची व्याप्ती वाढली आहे. डिजिटल माहिती घ्यायची आहे. मोबाईल डेटा रिकव्हर करायचा आहे. आरोपीने अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. तपासासाठी आणखी ३ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकीलांनी केली.

पीडित महिलांचे वकील न्यायालयात काय म्हणाले?

advertisement
पीडित महिलेच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपी सहकार्य करत नाही हे योग्य नाही. त्यामुळे तपासाला विलंब होत आहे. ग्राउंड पातळीवरील तपास पूर्ण झालेला नाही, त्याचे कारण आरोपी आहे. तो सहकार्य करत नाही. पीडित महिला सुरुवातीपासून सांगत आहे की त्याने शोषण केले, धमक्या दिल्या. या प्रकरणाचा तपास करताना समाजात चांगला संदेश जायला हवा. दररोज तपासात नवनवीन माहिती समोर येते आहे. धक्कादायक बाबी पोलीस तपासात समोर येत आहेत. सखोल तपास योग्य दिशेने व्हावा, अशी पीडित महिलांची अपेक्षा असल्याचे वकील ॲड एम वाय काळे यांनी सांगितले.
advertisement

अशोक खरात याच्याविरोधात आतापर्यंत १० गुन्हे

खरातविरोधात आतापर्यंत एकूण १० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये ८ गुन्हे महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित असून, २ गुन्हे फसवणुकीचे आहेत. दरम्यान, या सर्व प्रकरणांचा तपास विशेष तपास पथक करत आहे. विविध तक्रारी, पुरावे आणि पीडितांचे जबाब यावरून तपास पुढे सरकत आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तपासाची व्याप्ती आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अशोक खरातला एक एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भोंदूबाबा खरात प्रकरणातील पीडित महिलांचे वकील काय म्हणाले? न्यायालयात काय घडलं?
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement