छत्रपती संभाजीनगर हादरलं! 32 वर्षीय तरुणाचे गुप्तांग कापलं अन् रस्त्यावर फेकलं, अमानुष कृत्याने खळबळ
- Published by:Prachi Amale
Last Updated:
अमानुष कृत्य केल्यानंतर आरोपींनी जखमी तरुणाला पुन्हा रस्त्यावर आणून टाकले आणि तिथून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारी एक अत्यंत क्रूर घटना समोर आली आहे. गंगापूर-लासूर मार्गावरील शिंदेवाडी फाटा परिसरात एका 32 वर्षीय तरुणावर अमानुष हल्ला करून त्याचे गुप्तांग कापल्याच्या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे आणि दहशतीचे सावट पसरले असून शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
advertisement
गंगापूर तालुक्यातील शिंदेवाडी फाटा परिसरात शनिवारी रात्री एका तरुणावर झालेल्या अमानुष हल्ल्याने नागरिक सुन्न झाले आहेत. 32 वर्षीय तरुण या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचे गुप्तांग कापून त्यांना मृत्यूच्या दारात ढकलले आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या या कृत्यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक उरला आहे का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
advertisement
बळजबरीने उचलून शेतात घेऊन गेले
समोर आलेल्या माहितीनुसार, तरुण हा शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिंदेवाडी फाट्यावरून जात असताना दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना गाठले. रस्त्यालगत असलेल्या एका शाळेजवळून त्यांना बळजबरीने उचलून जवळच असलेल्या एका निर्जन शेतात नेण्यात आले. तिथे हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने भीषण हल्ला चढवला. नराधमांनी केवळ मारहाण न करता तरुणाच्या गुप्तांगावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
advertisement
हल्ला केल्यानंतर रस्त्यावर फेकले
हे अमानुष कृत्य केल्यानंतर आरोपींनी जखमी तरुणाला पुन्हा रस्त्यावर आणून टाकले आणि तिथून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेत तरुणी मदतीसाठी विव्हळत बराच वेळ तिथेच पडून होते. घटनेची माहिती मिळताच त्यांचे चुलत भाऊ लक्ष्मण आळंजकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना रात्री साडेआठच्या सुमारास गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
advertisement
हल्ला जुन्या वैमनस्यातून झाला की प्रेमप्रकरणातून?
या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हा हल्ला जुन्या वैमनस्यातून झाला की प्रेमप्रकरणातून? याचा शोध पोलीस घेत आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. भरवस्तीतून तरुणाला उचलून त्याचे हाल करणाऱ्या नराधमांना तातडीने बेड्या ठोकण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 4:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छत्रपती संभाजीनगर हादरलं! 32 वर्षीय तरुणाचे गुप्तांग कापलं अन् रस्त्यावर फेकलं, अमानुष कृत्याने खळबळ








