Summer Tips : माठ विकत घेताना 'ही' गोष्ट तुम्ही तपासता ना? पाणी थंड होण्यासाठी हेच असतं महत्त्वाचं
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
उन्हाळ्यात माठ विकत घेताना काही छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी तपासणं खूप आवश्यक असतं. कारण याचमुळे पाणी थंड होतं आणि आपल्याला ते प्यावंसं वाटतं.
मुंबई : उन्हाळ्यात प्यायला थंड पाणी सर्वांनाच हवं असतं. पण बरेच लोक उन्हाळा असला तरीही फ्रिजमधलं पाणी पीत नाही. कारण त्यामुळे त्यांना त्रास होतो. अशावेळी माठाचं पाणी जास्त सोयीचं आणि फायदेशीर ठरतं. माठातलं पाणी चांगलं असलं तरी ते जर थंडच झालं नाही तर ते प्यावंसंही वाटत नाही. म्हणूनच माठ घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे. नाहीतर माठातलं पाणी थंड होत नाही आपल्याला ते प्यावंसं वाटतं नाही.
या पद्धतीने निवडा चांगला माठ..
सगळ्यात आधी तर माठाला खूप जास्त गळती होते का? त्याला खूप बारीक बारीक छिद्र आहेत का ते तपासा. माठातून थोड्या प्रमाणात पाणी झिरपणं योग्य असतं. कारण त्यामुळे माठ थंड व्हायला मदत होते. पण माठ खूप जास्त गालात नाही ना हे तपासा. त्यासाठी माठ बोटाने थोडा वाजवून पाहा. वाजवल्यानंतर कंपनाचा आवाज स्पष्ट येत असेल तर माठ भरीव आहे. पण जर आवाज दबका असेल आणि कंपन होत नसेल, तर त्याला गळती असू शकते.
advertisement
तुम्हाला खूप शंका वाटल्यास मठामध्ये थोडं पाणी टाकून तुम्ही तपासू शकता. माठात पाणी भरा एखाद्या कोरड्या जागी ठेवा. यानंतर पाणी गाळतंय की नाही हे तपासा. कमी वेळेत जास्त पाणी गळत असेल तर तो माठ योग्य नाही. खूप किंचित पाणी गळत असेल तर तुम्ही तो माठ घेऊ शकता.
हल्ली बाजारात खूप तर्हेतर्हेचे आणि रंगांचे माठ येतात. पण जास्त रंग किंवा डिझाइन असलेला माठ शक्यतो घेऊ नका. कारण यात बऱ्याचदा रासायनिक रंग वापले जातात.. ज्यामुळं माठ तर सुंदर दिसतो. पण माठामध्ये पाणी झिरपण्यासाठी जे अगदी बारीक बारीक छिद्र असतात. ती छिद्र हा रंग बंद करतो. यामुळे माठामध्ये थंड हवा जात नाही आणि माठ जास्त प्रमाणात पाणी थंड करत नाही.
advertisement
माठ खरेदी करताना त्याचे तोंड मोठे म्हणजेच रुंग असावे. कारण यामुळे माठातलं पाणी काढायलाही सोपं जातं आणि माठ स्वच्छ कारणंही अवघड जात नाही. शिवाय माठामध्ये हवा खेळती राहाते, ज्यामुळे माठातलं पाणी व्यवथित थंड होतं.
माठाला कोणत्या प्रकारचा रंग दिलेला आहे तेदेखील तपासा. म्हणजे फिकट लाल, तपकिरी किंवा बेज रंगाचे माठ शक्यतो नैसर्गिक मातीपासून बनवलेले असतात. पण खूप गडद लाल किंवा चमकदार रंगाचे माठ रासायनिक रंग किंवा पॉलिश वापरून बनवलेजातात. अशा माठात पाणी थंड होत नाही.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 4:08 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Summer Tips : माठ विकत घेताना 'ही' गोष्ट तुम्ही तपासता ना? पाणी थंड होण्यासाठी हेच असतं महत्त्वाचं








