TRENDING:

Monsoon Hacks : पावसाळ्यात लाकडाचे खिडकी-दरवाजे फुगून जाम झालेत? 7 उपाय वापरा, जाम झालेल्या गोष्टी एका झटक्यात उघडतील

Last Updated:

अनेकदा लाकडी खिडक्या, दरवाजे हे पावसाळ्यात फुगून जाम होतात. अशावेळी त्यांना उघडताना नाकीनऊ येतो. तेव्हा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे जाम झालेल्या गोष्टी लगेच उघडण्यास मदत होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पावसाळ्यात घराच्या भिंती ओलसर होणे, छतातून पाणी टपकणे तसेच दरवाजे खिडक्या फुगून जाम होणे या नेहमीच्या समस्या आहेत. अनेकदा लाकडी खिडक्या, दरवाजे हे पावसाळ्यात फुगून जाम होतात. अशावेळी त्यांना उघडताना नाकीनऊ येतो. तेव्हा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे जाम झालेल्या गोष्टी लगेच उघडण्यास मदत होईल.
पावसाळ्यात लाकडाचे खिडकी-दरवाजे फुगून जाम झालेत?
पावसाळ्यात लाकडाचे खिडकी-दरवाजे फुगून जाम झालेत?
advertisement

पावसाळ्यात जाम झालेले खिडकी दरवाजे असे करा ठीके :

जर पावसाळ्यात दरवाजा उघडण्यात अडचणी येत असतील तर याच कारण पाणी असू शकत. तेव्हा लक्ष द्या की दरवाजातील लाकडाचा कोणताही भाग तुटलेला नसावा. यात तुम्ही थोडं मोहरीचं तेल टाका. मग ते अगदी लगेच उघडण्यास मदत होईल.

खिडकी आणि दरवाजे पावसात भिजले तर पाऊस थांबल्यावर लगेचच ते पुसून टाका. ओलावा राहिल्याने लाकूड खराब होते. दरवाजे सुकवण्यासाठी तुम्ही त्यांच्या समोर टेबल फॅन लावू शकता किंवा हेअर ड्रायरने त्यांना सुकवू शकता. तसेच दरवाजाच्या कडीला सुद्धा नीट पुसून घ्या जेणेकरून त्यांना जंग लागणार नाही.

advertisement

खिडकी आणि दरवाज्याच्या कड्या जाम झाल्या असतील तर त्यावर मोहरीचं तेल आणि मेणबत्ती वापरा. मेणबत्ती आगीने वितळवून कड्यांवर ओतून मिनिटभर चोळा. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जाम झालेले दरवाजे आणि खिडक्या आवाज न करता व्यवस्थित उघडू लागतील.

जंग दूर करण्यासाठी तुम्ही सॅंड पेपरचा वापर करू शकता. याला गंज लागलेल्या कड्यांवर घासाल तर दरवाजे आणि खिडक्या अगदी सोप्या पद्धतीने उघडतील.

advertisement

पावसाळ्यात घराच्या खिडकी आणि दरवाजे यांना नियमितपणे साफ करा. दरवाज्यांचे नट अनेकदा सैल होतात. तेव्हा हे नट नियमित तपासत राहा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

लाकडाला बुरशी लागली आहे की नाही हे तपासा. कारण बुरशी लाकडाला पोकळ बनवते. पावसाळ्यात खिडकी दरवाजे ओले झाल्याने त्यांना बुरशी लागण्याची शक्यता असते. तेव्हा पावसाळ्या आधीच बुरशी लागलेले दरवाजे खिडक्या बदलून घ्या.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Monsoon Hacks : पावसाळ्यात लाकडाचे खिडकी-दरवाजे फुगून जाम झालेत? 7 उपाय वापरा, जाम झालेल्या गोष्टी एका झटक्यात उघडतील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल