TRENDING:

Pre-Post Workout Food : वर्कआउट करताना थकवा येतो? व्यायामापूर्वी आणि नंतर 'हे' पदार्थ खा, मिळेल प्रचंड ऊर्जा!

  • Published by:
Last Updated:

Best Pre And Post Workout Nutrition Tips : तुम्ही सकाळी योग करत असाल, ताकदीचा व्यायाम करत असाल किंवा लांब धावण्यासाठी जात असाल, तर योग्य आहार घ्या. कारण योग्य आहार घेतल्यास तुमची कार्यक्षमता, रिकव्हरी वाढते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : व्यायामशाळेत जाऊन घाम गाळल्यानंतरही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत? याचे एक महत्त्वाचे कारण तुमच्या आहारात दडलेले असू शकते. अनेक जण आकर्षक पॅकेजेसमध्ये बंद असलेल्या एनर्जी बार्स किंवा स्नॅक्सना पसंती देतात. परंतु खरी ऊर्जा प्रयोगशाळेत बनवलेल्या प्रोटीन पावडर किंवा कृत्रिम साखरेतून येत नाही, ती नैसर्गिक आणि साध्या घटकांमधून येते. हे नैसर्गिक घटक शरीर सहज ओळखते आणि ताकद वाढवण्यासाठी वापरते. तुम्ही सकाळी योग करत असाल, ताकदीचा व्यायाम करत असाल किंवा लांब धावण्यासाठी जात असाल, तर योग्य आहार घ्या. कारण योग्य आहार घेतल्यास तुमची कार्यक्षमता, रिकव्हरी वाढते. शिवाय तुम्हाला दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी खूप मदत होते.
'क्लीन एनर्जी स्नॅक्स' म्हणजे काय?
'क्लीन एनर्जी स्नॅक्स' म्हणजे काय?
advertisement

तज्ञांच्या मते व्यायामापूर्वी पोट भरण्यापेक्षा शरीराला ऊर्जा देणे जास्त महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला लवकर पचतील असे कार्बोहायड्रेट्स खाण्याची गरज असते. यासोबतच थोडेसे वनस्पती-आधारित प्रोटीन किंवा हेल्थी फॅट्स घेतल्यास रक्तातील साखर स्थिर राहते आणि तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करता येते. कधीही शरीराची ऊर्जा अचानक वाढवणाऱ्या घटांकऐवजी स्थिर ऊर्जा देणारे नैसर्गिक घटक वापरणे सर्वात योग्य आहे. यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या प्रक्रिया केलेल्या एनर्जी बार्सऐवजी काही नैसर्गिक पर्याय वापरू शकता.

advertisement

एनर्जी बार्सऐवजी वापरा हे नैसर्गिक पर्याय

केळी आणि आल्मंड बटर

केळी आणि आल्मंड बटर यांचे मिश्रण कार्बोहायड्रेट्स आणि निरोगी चरबीचा उत्तम स्रोत आहे. केळी नैसर्गिक साखरेमुळे त्वरित ऊर्जा पुरवते, तर आल्मंड बटर फॅट्स प्रदान करते. यामुळे शरीराची ऊर्जा दीर्घकाळ टिकते. व्यायामापूर्वी एका मध्यम आकाराच्या केळ्यावर 1-2 चमचे आल्मंड बटर लावून खाऊ शकता. हे हलके, पचायला सोपा आणि पौष्टिक असते.

advertisement

वनस्पती प्रोटीनची स्मूदी

फ्लॅक्ससीड्स आणि चिया सीड्ससह बनवलेले संपूर्ण वनस्पती प्रोटीनचे स्मूदी हा एक शक्तिशाली पर्याय आहे. यात प्रोटीन फायबर आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स असतात जे हळूहळू ऊर्जा सोडतात आणि तुम्हाला दीर्घकाळ ताजेतवाने ठेवतात.

ओट्स, बेरी आणि फ्लॅक्ससीड्स, आल्मंड मिल्क

रात्रभर आल्मंड मिल्कमध्ये भिजवलेले ओट्स, त्यावर ताज्या बेरीज आणि फ्लॅक्ससीड्स टाकून तयार केलेला हा पर्याय मऊ आणि ऊर्जादायी असतो. ओट्समध्ये हळूहळू ऊर्जा देणारे जटिल कार्बोहायड्रेट्स असतात, तर बेरीज अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लॅक्ससीड्स फायबर आणि निरोगी फॅट्स प्रदान करतात.

advertisement

हे पदार्थ देखील घेऊ शकता

याशिवाय, खजूर, पफ्ड मिलेट्स, सीड्स आणि मऊ फळे असे पदार्थ व्यायामापूर्वी खाण्यासाठी उत्तम आहेत. यात ग्लुकोज भरपूर प्रमाणात असते जे तुमच्या शरीराचे व्यायामासाठी मुख्य इंधन म्हणून काम करते.

का निवडावे नैसर्गिक पर्याय?

प्रक्रिया केलेले एनर्जी बार्स अनेकदा कृत्रिम घटकांनी युक्त असतात आणि ते दीर्घकाळात आरोग्यास हानिकारक ठरू शकतात. वरील नैसर्गिक पर्याय केवळ पौष्टिकच नाहीत, तर ते बनवायला सोपे, स्वस्त आणि स्वादिष्टही आहेत. यात साखरेचे प्रमाण कमी असते आणि नैसर्गिक पोषक तत्त्वांनी युक्त असल्याने शरीराला संतुलित ऊर्जा मिळते.

advertisement

हे पदार्थ खाणे टाळा

व्यायामाआधी तळलेले, चिकट किंवा जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ पूर्णपणे टाळा. हे पदार्थ वर्कआउटच्या वेळी अस्वस्थता निर्माण करतात आणि तुमची ऊर्जा कमी करतात.

व्यायामानंतर शरीराची रिकव्हरी कशी करावी?

व्यायामानंतर शरीराला पुन्हा पोषक तत्वांची आणि हायड्रेशनची गरज असते. स्नायूंची पुन्हा बांधणी करण्यासाठी आणि शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यासाठी तुम्ही चांगल्या दर्जाचे प्रोटीन, इलेक्ट्रोलाइट्स, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि हेल्दी फॅट्स असलेले पदार्थ निवडू शकता.

व्यायामानंतरचा सर्वात उत्तम स्नॅक

नाचणी-मखाना लाडू हा व्यायामानंतरचा सर्वात उत्तम स्नॅक आहे. A2 तुपापासून बनवलेला आणि खजुरापासून नैसर्गिकरित्या गोड केलेला नाचणी-मखाना लाडू खाल्ल्याने हाडांना बळकटी मिळते आणि पचनासाठी फायबर मिळते. यातील गुड फॅट्स दाह कमी करण्यास आणि पोषक तत्वांचे शोषण वाढवण्यास मदत करतात. मखाना आणि खजुरातून मिळणारे स्वच्छ कार्ब्स शरीरातील ग्लायकोजनचा साठा पुन्हा भरून काढतात.

'क्लीन एनर्जी स्नॅक्स' म्हणजे काय?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मोबाईलचं व्यसन लागलंय? वेळीच असं सोडवा, नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम
सर्व पहा

'क्लीन एनर्जी स्नॅक्स' म्हणजे असे खाद्यपदार्थ ज्यात कोणतीही कृत्रिम साखर, प्रिझर्व्हेटिव्हज, कृत्रिम स्वीटनर्स, इमल्सिफायर्स किंवा कृत्रिम रंग आणि स्वाद नसतात. यात स्प्राउटेड पीठ, शुद्ध गाईचे तूप, खजूर किंवा गूळ यांसारखे नैसर्गिक स्वीटनर्स आणि बिया, नट्स आणि धान्य यांसारखे केवळ शुद्ध आणि पौष्टिक घटक असतात. हे स्नॅक्स शरीराला उत्तम आणि टिकाऊ ऊर्जा प्रदान करतात. वर्कआउट रुटीननुसार योग्य आणि संतुलित आहार निवडल्यास तुम्ही तुमच्या शरीराची ऊर्जा वाढवण्यासोबतच शरीराला उच्च पातळीवर काम करण्यासाठी तयार करू शकता. या सर्व पदार्थांपासून मिळणाऱ्या उर्जेलाच 'क्लीन एनर्जी' म्हणतात.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pre-Post Workout Food : वर्कआउट करताना थकवा येतो? व्यायामापूर्वी आणि नंतर 'हे' पदार्थ खा, मिळेल प्रचंड ऊर्जा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल