पहिला गट - सुरक्षित लोक
जे लोक सक्रिय जीवनशैली जगतात, ज्यांना छातीत दुखणे, धाप लागणे, चक्कर येणे असे लक्षणे नाहीत, ज्यांचा बीपी आणि शुगर नॉर्मल आहे आणि ज्यांना हृदयाचे आजार नाहीत, त्यांच्यासाठी जिमला जाणे पूर्णपणे सुरक्षित आहे. अशा लोकांनी व्यायाम अचानक खूप जड सुरू न करता हळूहळू इंटेन्सिटी वाढवावी. काही त्रास जाणवला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
advertisement
दुसरा गट – सावध राहणारे लोक
ज्यांचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त आहे, ज्यांना बीपी किंवा डायबिटीज आहे. धूम्रपान करणारे लोक किंवा ज्यांना हलका व्यायाम केल्यावर लगेच श्वास लागतो, अशांनी जिम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांकडून परवानगी घ्यावी. तसेच ईसीजी, बीपी, शुगर, लिपिड प्रोफाईल सारखे टेस्ट करून घ्यावेत. जर रिपोर्ट बॉर्डरलाईन असेल तर सुधारल्यानंतरच जिम सुरू करणे योग्य ठरेल.
तिसरा गट – उच्च धोका असलेले लोक
ज्यांना आधीपासून हृदयविकार, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, चक्कर, स्ट्रोक, किडनीचे आजार आहेत, अशांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय व्यायाम सुरू करू नये.ईसीजी, इकोकार्डियोग्राफी, ब्लड टेस्ट करूनच जिम जॉइन करावे. कुटुंबात हृदयविकाराची हिस्ट्री असणाऱ्यांनीही काळजी घ्यावी.
आहार आणि सप्लिमेंट्सबाबत सूचना
सामान्य निरोगी व्यक्तीने वजनाच्या प्रति किलोवर 0.83 ग्रॅम प्रोटीन घ्यावे. बॉडी बिल्डर्सनी 1.2 ग्रॅम प्रोटीन घ्यावे. प्रोटीनसाठी चिकन, अंडी, मासे, पनीर, डाळी, दूध, दही घेता येते. प्रोटीन पावडर किंवा क्रिएटिन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये,कारण त्यामुळे लिव्हर आणि किडनीला नुकसान होऊ शकते. अंडी दिवसाला चारपेक्षा जास्त खाऊ नयेत. एनर्जी ड्रिंक्स, अति कॅफिन, एनाबॉलिक सप्लिमेंट्स टाळावेत.(वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
