केळ्याचं हा पदार्थ बनवण्यासाठी अगदी मोजकंच साहित्य लागेल. गव्हाचं पीठ किंवा मैदा, केळी, हळद, पाणी, तेल किंवा तूप. आता हा पदार्थ कोणता आणि तो कसा बनवायचा, त्याची रेसिपी सविस्तर पाहुयात.
2 कप गव्हाचं पीठ किंवा मैदाचं पीठ किंवा दोन्ही पीठ मिक्स करून वापरू शकता. पण आपल्याला पौष्टीक बनवायचं आहे म्हणून गव्हाचं पीठच वापरा. हळद आणि थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्या. जितकं कणीक चांगली मळाल तितक्या पोळ्या टम्म फुगतील, फुटणार नाही. पीठ घट्ट झालं तर पोळ्या कडक होतात, फुटतात. थोडंसं तेल लावून झाकण ठेवून बाजूला ठेवून द्या. 15-20 मिनिटं भिजत ठेवा.
advertisement
मुंबईकरांच्या जवळचा पदार्थ, सोलापुरात संगम होतो, नाशकात उलटा; सांगा पाहू तो कोणता?
गॅसवर पॅन ठेवा, त्यात तूप घाला आणि अर्धा कप बारीक रवा मंद आचेवर चांगला भाजून घ्या. आता 3 पिकलेली केळी घ्या. लहान असतील तर 4 आणि मोठ्या असतील तर 2 केळी घ्या. त्याच्या फोडी करून मिक्सरला लावून पेस्ट करून घ्या.
रवा लालसर झाला की त्यात केळ्याची प्युरी घालून मिक्स करून घ्या. केळी आणि रवा चांगला मिक्स झाला की यात थोडं गूळ घालून मिक्स करून घ्या. मिश्रणाचा गोळा होईपर्यंत परतवून घ्या. यात जायफळ पूड टाका, हवं तर सुकं खोबरं भाजून यात टाकू शकता. पुरण थंड करून त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या.
गव्हाचं मळलेलं पीठ थोडं पुन्हा मळून घ्या. याचेही गोळे करा. त्यात पुरणाचे गोळे टाका आणि पुरणपोळी करतो तशा पोळ्या लाटून घ्या. तवा गरम करून त्याला तेल किंवा तूप लावून त्यावर पोळी टाका. वर बबल्स आले की पोळी परतून घ्या. दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूंनी चांगली शेकवून घ्या. ही तयार झाली केळीची पुरणपोळी. नेहमीच्या पुरणपोळीपेक्षा वेगळी.
तुम्हीसुद्धा केळीची ही पुरणपोळी करून पाहा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियावर नक्की सांगा.
