या ड्रिंकमध्ये फळ आणि सर्व पौष्टिक पदार्थ आहेत. शिवाय यात साखर नाही. म्हणून ही ड्रिंक आणखी हेल्दी बनते. ज्या लोकांना दूध आवडत नाही किंवा चालत नाही. त्यांच्यासाठीही ही ड्रिंक बेस्ट आहे. या ड्रिंकची रेसिपी the.food.talks या इंस्टाग्राम हँडलवर दिली गेली आहे. चला तर मग पाहूया ही हेलादी आणि टेस्टी स्मूदी कशी बनवायची.
advertisement
खरबूज स्मूदी बनवण्यासाठी लागणारं साहित्य..
- खरबूज
- किसलेला नारळ
- वेलची
- बिया काढलेले खजुर
- पाणी
- बर्फ
- सब्जाच्या बिया
- सुकामेवा
खरबूज स्मूदी बनवण्याची पद्धत..
- सर्वात आधी अर्धा मध्यम आकाराचा पिकलेला खरबूज घ्या.
- हा खरबूज कापा आणि त्यातल्या बिया काढून त्याचे तुकडे करून घ्या.
- आता मिक्सरच्या भांड्यात हे खरबुजाची तुकडे घ्या.
- त्यानंतर यामध्ये थोडा ओला किसलेला नारळ टाका.
- नारळाच्या किसऐवजी तुम्ही नारळाचे दूधही वापरू शकता.
- आता यामध्ये 2 वेलची, 3-4 बिया काढलेले खजुर आणि एक मोठा ग्लास पाणी टाका.
- हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये अगदी गुळगुळीत होईपर्यंत वाटून घ्या.
- आता हे मिश्रण बर्फाने भरलेल्या एका ग्लासमध्ये ओता.
- त्यानंतर त्यात भिजवलेल्या सब्जाच्या बिया टाका.
- तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार इतर बिया आणि सुकामेवादेखील टाकून सर्व्ह करू शकता.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
