शिळ्या इडली, डोशाप्रमाणेच तुम्ही त्याच्य शिळ्या चटणीपासूनही एक वेगळा पदार्थ बनवू शकता. वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. आता या चटणीपासून काय वेगळा पदार्थ बनवणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि ते जाणून घेण्याची उत्सुकता असेल.
जितकी चटणी शिल्लक त्या प्रमाणात अंडी घ्या. व्हिडीओवरून तुम्ही चटणी आणि अंड्याच्या प्रमाणाचा अंदाज घेऊ शकता. अंडी फोडून चटणीत टाका. आता यात मीठ आणि काळी मिरीपूड टाकून नीट मिक्स करून घ्या.
advertisement
गॅसवर तवा गरम करायला ठेवा. त्यात तेल पसरवून घ्या. तेल तापलं की त्यात चटणी आणि अंडी यांचं मिश्रण ओतून चमच्याने नीट सारखं पसरवून घ्या. आता यावर झाकण ठेवून शिजवून घ्या. थोड्या वेळाने झाकण काढून अंडं पलटून घ्या आता पुन्हा झाकण ठेवून दुसऱ्या बाजूनेही नीट शिजवून घ्या.
आता खायला तयार आहे चटणी आणि अंड्यापासून बनवलेलं हे वेगळ्या प्रकारचं ऑम्लेट. याचा व्हिडीओ palaniuncle इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.
त्यामुळे यापुढे तुमच्याकडे खोबऱ्याची चटणी उरली तर ती फेकून नका तर अशा पद्धतीने चटणी ऑम्लेट करून पाहा आणि कसं झालं आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
