पण मटारचं सीझन आहे. पुन्हा लवकर काही मटार खायला मिळणार नाहीत. तसंच मटार स्वस्तही झाले आहेत म्हणून लोक भरपूर मटार खरेदी करत आहेत. पण आता इतक्या मटारचं काय करायचं. रोज तेच तेच पदार्थ नको. तर मटारची ही रेसिपी बनवून पाहा.
advertisement
गॅसवर कढई गरम करा, त्यात तेल टाका. जिरं फोडणीला टाका. आता यात कांदा, आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो टाकून कांदा लाल होईपर्यंत आणि टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घ्या. आता यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, किचन किंग मसाला, मीठ टाकून परतून घ्या.
आता मटार मिक्सरमध्ये असेच वाटून घ्या, ते कढईत टाका आणि त्याच्यासोबतच मेथीची पाने टाकून चांगले मिक्स करून घ्या. थोडी पाणी आणि अख्खे मटार टाकून झाकण मारून शिजवून घ्या, मटार शिजले की त्यात दही, काजूची पेस्ट, धनेपूड टाकून नीट मिक्स करा. कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
एकदा खाल तर, गाजराचा हलवा खाणंच विसराल; चविष्ट रबडीसारखी दाटसर गाजराची खीर, रेसिपी Video
अरे हो! या रेसिपीचं नाव सांगायचं राहिलं नाही का, मटारचा हा पदार्थ आहे मटार खिमा. @archees_kitchen11 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्हाला हा मटार खिमा पाहताना कसा वाटला, तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पाहा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
तुम्ही मटारपासून असा आणखी कोणता वेगळा पदार्थ बनवत असाल तर त्याची रेसिपीही आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका. ती रेसिपी आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
