निस्त्याची चटणी हे नाव वाचताच निस्ता म्हणजे काय? हा प्रश्न सगळ्यात आधी पडतो. कारण सामान्यपणे रेसिपी त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या मुख्य पदार्थाच्या नावावरून ओळखली जाते जशी खोबरं म्हणून खोबऱ्याची चटणी, लसूण म्हणून लसूण चटणी, मग निस्त्याची चटणीत निस्ता हा काय प्रकार आहे?
Methi Recipe Video : ना भाजी, ना थेपला; आजीने बनवला मेथीचा चटपटीत पदार्थ, शेअर केली रेसिपी
advertisement
तर निस्ता हा कोणता पदार्थ नाही तर निस्ता म्हणजे कमी पदार्थात झटपट तयार होणारी, पोट भरेल असं. खान्देशी भाषेतील हा शब्द आहे आणि ही चटणीसुद्धा खान्देशी आहे. तिथं रोजच्या जेवणात खाल्ली जाणारी, अतिशय तिखट, झणझणीत आणि सुगंधी अशी पारंपरिक चटणी आहे.
निस्त्याच्या चटणीसाठी लागणारं साहित्य
सुक्या लाल मिरची - 8-10
लसूण - 10-15 पाकळ्या
चिंच - अर्धा टेबलस्पून
गूळ - एक टेबलस्पून (आवडीनुसार कमी-जास्त)
जिरं - अर्धा टिस्पून
बडीशेप - अर्धा टिस्पून
कोथिंबीर
मीठ - चवीनुसार
निस्त्याची चटणी कशी बनवायची?
ही चटणी बनवण्यासाठी खास चपट्या मिरच्या वापरल्या जातात, ज्यात खान्देशी, वऱ्हाडी भागात प्रामुख्याने वापरतात. शहरात तुम्हाला या मद्रास चपाटा मिरच्या म्हणून मिळतील. ज्या कमी तिखट असतात. या मिरच्यांऐवजी तुम्ही बेडगी मिरच्या वापरू शकता ज्या कमी तिखट असतात आणि त्यांचा रंग चांगला असतो.
मिरच्यांचे देठ काढून तवा किंवा कढईत भाजा. भाजताना थोडं तेल घाला म्हणजे मिरच्या खमंग भाजल्या जाात. गॅस बंद करून मिरच्या थंड करून घ्या. मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात मिरच्याची भुकटी ठेवून त्यात लसूण, चिंच, गूळ, जिरं, मीठ, बडीशेप, कोथिंबीर आणि थोडं पाणी घालून वाटून घ्या. निस्त्याची चटणी तयार.
Weird Recipe : गाजर नाही, दुधी नाही तर चक्क कांद्याचा हलवा; बनवतात तरी कसा? Watch Video
ही चटणी कळण्याच्या भाकरी, त्यावर चटणी आणि शेंगदाण्याचं कच्चं तेल, सोबतीला कांदा. अहाहाहा.... ही चटणी साधी भाकरी, चपाती, धपाटे, थेपले कशासोबतही छान लागते. ही चटणी अशीच बाहेर 3-4 दिवस टिकते. फ्रिजमध्ये हवाबंद डब्यात एक-दीड महिना चांगली टिकते.
Swaras Art युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही ही चटणी करून पाहा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
