Weird Recipe : गाजर नाही, दुधी नाही तर चक्क कांद्याचा हलवा; बनवतात तरी कसा? Watch Video
- Published by:Priya Lad
Last Updated:
Onion Halwa Recipe : कांद्याचा हलवा वाचूनच विचित्र वाटेल, पण या विचित्र रेसिपीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हा कसा काय बनवतात? आणि खातं तरी कोण? असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल.
हलवा म्हटलं की एकतर सगळ्यात आधी समोर येतो तो गाजरचा हलवा आणि दुसरं म्हणजे दुधी हलवा. हे दोन प्रकारचे हलवे तुम्ही खाल्ले असतील. पण कांद्याचा हलवा तुम्ही कधी खाल्ला आहे का? कांद्याचा हलवा वाचूनच विचित्र वाटेल, पण या विचित्र रेसिपीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
कांदा डाळ, आमटी, भाजीत फोडणीसाठी वापरला जातो. याशिवाय वेगवेगळ्या पदार्थांमध्ये, वाटणातही वापरला जातो. कांद्यापासून कांदा भजी बनवतात, सलाडमध्ये कांदा वापरतात, कच्चा कांदाही खाल्ला जातो. पण कांद्याचा हलवा... हा कसा काय बनवतात? आणि खातं तरी कोण? असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. आधी कांद्याचा हलवा कसा बनवतात ते पाहुयात.
advertisement
व्हिडीओत दाखवल्यानुसार कांदा उभा चिरायचा आहे, पातळ स्लाइस करून घ्याचे आहेत. गॅसवर कढई ठेवून त्यात पाणी गरम करायचं आणि त्यात कांदा टाकून उकळून घ्यायचा. आता यात व्हिनेगर टाकायचं. थोड्या वेळाने कांदा कढईतून काढून गाळून घ्या. साध्या पाण्याने धुवा आणि पुन्हा कढईतील गरम पाण्यात टाकून पुन्हा काढून घ्या. थंड झाला की मिक्सरच्या भांड्यात घ्या. यामध्ये काजू आणि भिजवलेला बदाम टाकून पेस्ट करून घ्या.
advertisement
एका भांड्यात तूप घेऊन ते गरम करा. त्यात कांदा, काजू, बदामाची पेस्ट टाकून 20 मिनिटं परतून घ्या. पुन्हा थोडं तूप आणि दूध टाका. 10 मिनिटं शिजवून घ्या. आता यात साखर आणि वेलची पूड टाकून आणखी 5 मिनिटं परतून घ्या. वरून कापलेले ड्रायफ्रूट्स टाका. कांद्याचा हलवा खाण्यासाठी तयार.
advertisement
Poonamrirasoi इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा कांद्याचा रेसिपी व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत ही महिला तिच्या नवऱ्याला हलवा खायला देतो आणि खाल्ल्यानंतर त्याची रिअॅक्शन टेस्टी, Wow अशी असते.
पण हा कांद्याचा हलवा अनेकांच्या पचनी पडलेला नाही. तर काही युझर्सनी मात्र या कांद्याच्या हलव्याबाबत माहिती दिली आहे. एकाने ही ट्रेडिशनल रेसिपी असल्याचं म्हटलं आहे. तर एकाने ही मेनस्ट्रीम मिठाई नसली तरी यूपी, राजस्थान, हैदराबाद आणि पंजाब अशा ठिकाणी घरोघरी बनवली जाणारा हा गोड पदार्थ असल्याची माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
आता खरंच हा कांद्याचा हलवा टेस्टी लागतो की नाही हे आता आपण रेसिपी बनवली तरच समजेल. तर तुम्ही एकदा हा कांद्याचा हलवा ट्राय करून पाहा आणि कसा झाला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view commentsLocation :
Delhi
First Published :
December 16, 2025 1:01 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Weird Recipe : गाजर नाही, दुधी नाही तर चक्क कांद्याचा हलवा; बनवतात तरी कसा? Watch Video










