"बाबा वाचवा..." म्हणण्याची संधी मिळाली नाही; बापाच्या समोरच नियतीने हिरावला जीव, चिमुरड्यांच्या मृत्यूने सुन्न झाला आसमंत
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Tragic School Bus Accident: उत्तर बेंगळुरूमधील थानिसंद्रा येथे शाळेच्या बसच्या भीषण अपघातात दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दूध आणण्यासाठी निघालेल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या दुचाकीला बसची धडक बसल्याने ही शोकांतिका घडली.
बेंगळुरू: उत्तर बेंगळुरूतील थानिसंद्रा परिसरात बुधवारी सकाळी शाळेच्या बसने एका दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघात दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेत मृत्यू पावलेल्या मुलांची ओळख वर्षा (वय 2) आणि भानू (वय 4) अशी करण्यात आली आहे. वर्षा ही शहरातील एका पोलीस कॉन्स्टेबलची मुलगी तर भानू ही त्यांची पुतणी होती. सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास, हेन्नूर ट्रॅफिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पोलीस क्वार्टर्सजवळ हा अपघात घडला.
पोलिसांच्या माहितीनुसार, सिटी आर्म्ड रिझर्व्हमध्ये कार्यरत असलेले कॉन्स्टेबल नागनगौडा हे आपल्या दुचाकीवरून दूध आणण्यासाठी जात होते. त्यांच्या दुचाकीवर त्यांची दोन वर्षांची मुलगी वर्षा आणि मोठ्या भावाची चार वर्षांची मुलगी भानू बसलेली होती. त्याच वेळी शाळा सुटण्याची आणि मुलांना घेऊन जाण्याची गर्दीची वेळ होती. एका शाळेची बस वळण घेत असताना उभी असलेल्या दुचाकीला धडक दिल्याचा आरोप आहे.
advertisement
Horrific incident from Bengaluru. Two children, 2-yr-old Varsha & 4 yr-old Bhanu killed as a school bus runs over them. The father was headed to buy milk with the kids when the school bus that was turning rams into the bike & ran over the kids, killing them on the spot. pic.twitter.com/lApeCPTNVO
— Deepak Bopanna (@dpkBopanna) February 11, 2026
advertisement
या धडकेमुळे दोन्ही मुले रस्त्यावर फेकली गेली. त्यानंतर बसचे मागील चाक त्यांच्या अंगावरून गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दोन्ही मुलांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या अपघातात कॉन्स्टेबल नागनगौडा यांना किरकोळ दुखापत झाली आहे. मृत मुलांचे मृतदेह पुढील तपासणी आणि शवविच्छेदनासाठी येळहंका येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
advertisement
दरम्यान बसचालकाला ताब्यात घेण्यात आले असून हेन्नूर ट्रॅफिक पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 7:35 PM IST
मराठी बातम्या/देश/
"बाबा वाचवा..." म्हणण्याची संधी मिळाली नाही; बापाच्या समोरच नियतीने हिरावला जीव, चिमुरड्यांच्या मृत्यूने सुन्न झाला आसमंत






