ही रेसिपी तुम्ही एकदा केलीत तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही वारंवार बनवाल. ही रेसिपी myflavourfuljourney या इंस्टाग्राम अकाऊंटवर दिली गेली आहे. ही बनवायला एकदम सोपी आणि चवीला अप्रतिम आहे.
कैरीच्या कढीसाठी साहित्य..
- कैरी
- ओला नारळ
- हिरवी मिरची
- लसूण
- आलं
- कोथिंबीर
- जिरं
advertisement
- मीठ
- साखर
- पाणी
अशी बनवा कैरीची थंडगार कढी..
- सर्वात आधी 1 कैरी कुकरमध्ये 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या.
- कैरी शिजल्यानंतर तिची साल काढा आणि कैरीचा गर वेगळा करून घ्या.
- दुसरीकडे एक ओला नारळ सोलून घ्या आणि त्याच्या बारीक बारीक फोडी करून घ्या.
- आता एका मिक्सरच्या भांड्यात चिरलेला ओला नारळ घ्या.
- त्यामध्येच शिजवलेल्या कैरीचा गर टाका.
- आता यामध्ये की 1 हिरवी मिरची, 1 लसूण पाकळी, अर्धा इंच आलं, ताजी कोथिंबीर, 1 चमचा जिरं, चवीनुसार मीठ आणि 1 मोठा चमचा साखर घाला.
- थोडंसं पाणी घालून या सर्वांचा बारीक मिश्रण तयार करून घ्या.
- त्यानंतर एका स्वच्छ सुती कापडाच्या मदतीने हे मिश्रण दोनदा गाळून घ्या.
- शेवटी त्यात थोडी ताजी कोथिंबीर आणि बर्फ घाला.
अशाप्रकारे तुमची ही थंडगार कैरीची कढी तयार आहे. हे खरं तर शीतपेयच आहे, जे तुम्ही दुपारच्या कडक उन्हात पिऊ शकता याने तुमच्या शरीराला गारवा मिळेल आणि छान तरतरी येईल.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
