कशी झाली सुरुवात?
मूळचे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील असलेले दादासाहेब घोडे आणि अजिनाथ घोडे यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते 1994 मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये कामानिमीत्त आले. सुरुवातीला त्यांनी शहरातील कंपन्यामध्ये कँटीनमध्ये स्वयंपाकी लोकांच्या हाताखाली काम केलं. त्यानंतर हळूहळू स्वयंपाक शिकल्यानंतर स्वतःचा व्यवसाय करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी 2000 साली सिडको परिसरातील छत्रपती महाविद्यालयाच्या कमानी समोर हातगाडीवर नाश्ता सेंटर सुरू केलं.
advertisement
कांद्याची साल फेकून देण्यापूर्वी करा विचार, केसांसाठी आहेत आश्चर्यकारक फायदे
हातगाडी भाड्याची घेतली. सुरुवातीला ब्रेड वडा, आलू वडा, समोसा यासारखे नाश्त्याचे पदार्थ ठेवले यासोबतच राईस देखील त्यांनी या ठिकाणी ठेवला. हातगाडीवर ठेवलेल्या ब्रेड वडा, आलू वडा, समोसा या पदार्थांसोबत ग्राहक हे राईस मागवत होते. दरम्यान ही गोष्ट घोडे बंधूंच्या लक्षात आली आणि त्यांनी यावरती पर्यायी शोधत 2002 साली समोसा रस्सा राईस हॉटेलच्या माध्यमातून ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला.
दादासाहेब घोडे, अजिनाथ घोडे, अप्पासाहेब घोडे या तिघा भावांनी मिळून सुरू केलेली हॉटेल या हॉटेलचे नाव काय ठरवायचं यावरून तीन भावंड असल्यामुळे त्रिमूर्ती असं हॉटेलचं नाव ठेवण्यावर तिघा भावांचे एकमत झाले आणि हॉटेलचे नाव त्रिमूर्ती ठेवण्यात आलं. त्यासोबतच लहान भावाला लाडाने आप्पा म्हणत असल्यामुळे त्रिमूर्ती आप्पा असं नाव ठेवण्यावरती तिघे भावांचे एक मत झालले आणि तेव्हापासून त्रिमूर्ती आप्पा हे नाव छत्रपती संभाजीनगरकरांच्या सेवेत आहे.
मुलांना चॉकलेट देण्याची भीती वाटते? मग घरीच बनवा खजूर लॉलीपॉप, पाहा रेसिपी
समोसा राईससाठी कोणते पदार्थ वापरतात?
तांदूळ, जिरा, मोहरी, तेल, मिरची पावडर, हळदी, बीट रूट, शीमला, गाजर इत्यादी साहित्य राईस साठी वापरतात तर समोसा बनवण्यासाठी आलू, मसाला, बेसन, जिरा इत्यादी साहित्य वापरतात. तर स्पेशल पद्धतीने रस्सा बनवला जातो. यासाठी दर्जेदार साहित्य वापरतो असे घोडे बंधू सांगतात. या समोसा रस्सा राईसची किंमत 70 रुपये आहे.