TRENDING:

Fungal infection: पावसाच्या पाण्यामुळे बुरशीचा संसर्ग, या टीप्स वापरुन घ्या त्वचेची काळजी!

Last Updated:

पावसाच्या पाण्यामुळे पायात बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. काहींच्या त्वचेला भेगा पडतात तर काहींना जळजळ होते. यापासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय देखील केले जाऊ शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : पावसाच्या पाण्यामुळे पायात बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. काहींच्या त्वचेला भेगा पडतात तर काहींना जळजळ होते. यापासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय देखील केले जाऊ शकतात. कोणत्याही हवामानाचा प्रभाव सर्वप्रथम आपल्या त्वचेवर पडतो.
या टीप्स वापरुन घ्या त्वचेची काळजी!
या टीप्स वापरुन घ्या त्वचेची काळजी!
advertisement

जर बुरशीजन्य संसर्ग नखांपर्यंत पसरला असेल तर त्याला onychomycosis म्हणतात. यामध्ये नखांचा रंग पिवळा किंवा अगदी पांढरा होऊ लागतो आणि ते तुटण्याचा धोकाही वाढतो. पायाच्या संसर्गामध्ये, खाज येणं, जळजळ होणं आणि पुरळ उठणं असाही त्रास होतो. बुरशीमुळे पायाला वास येतो. काही जण पावसात बूट घालतात, पण काही वेळ पाय ओले राहिले तरीही त्वचेचा संसर्ग नक्कीच होतो.

advertisement

Health Tips: चिकन, अंडी विसरा; फक्त भाजीमध्ये मिसळा ही गोष्ट, मिळेल भरभरुन प्रोटीन!

1. कडुलिंबाची पानं आणि नारळाच्या तेलासारख्या गोष्टींचा वापर करून तुम्ही घरगुती उपायांनी त्वचेची ही समस्या कमी करू शकता किंवा आराम मिळवू शकता.

2. पायांची स्वच्छता महत्वाची-

पावसात पायाला भेगा किंवा जळजळीपासून संरक्षण करण्यासाठी स्वच्छता सर्वात महत्वाची आहे. पायांमध्ये घाण आणि ओलावा जमा होऊ देऊ नका. बोटांमध्ये भरपूर ओलावा असतो, म्हणून जेव्हा ते ओले होतात तेव्हा त्यांना लगेच स्वच्छ करा.

advertisement

3. खोबरेल तेल -

कोणत्याही ऋतूमध्ये त्वचेला मॉइश्चरायझ ठेवणं महत्वाचं आहे. रात्री झोपण्यापूर्वी पाय, हात आणि चेहऱ्याच्या त्वचेवर खोबरेल तेल लावा.

4. कोरफड जेल

- एलोवेरा जेल त्वचेसाठी वरदान आहे. हा एक विनामूल्य आणि प्रभावी उपाय आहे कारण त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. त्वचा चांगली ठेवण्यासाठी कोरफडीचा वापर हा सर्वोत्तम घरगुती उपाय आहे. जर त्वचा कापली गेली असेल किंवा त्यावर जळजळ होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी ते पूर्णपणे स्वच्छ करा आणि त्यावर कोरफड जेल लावा.

advertisement

5. व्हिनेगर हा देखील एक प्रभावी उपाय आहे. तुमच्या पायांच्या त्वचेची जळजळ आणि खाज सुटणं यासारख्या समस्या दूर ठेवण्यासाठी व्हिनेगरचा उपयोग होतो. पण हा उपाय करून पाहण्याआधी स्किन स्पेशालिस्ट किंवा तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

6. कडुलिंबाचं पाणी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

कडुलिंबात अनेक गुणधर्म आहेत, त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. कडुलिंबाचा रस अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरला जातो. नैसर्गिकरित्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या पानांची मदत घेऊ शकता. बादलीत गरम किंवा कोमट पाणी घेऊन त्यात कडुनिंबाच्या पानांचा रस टाकावा. इन्फेक्शन झालेले पाय त्यात काही काळ ठेवा. सुमारे 15 मिनिटांनंतर, त्वचा साध्या पाण्यानं धुवा. यातला बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध करणारा गुणधर्म त्वचा लवकर बरी होण्यास मदत करतो.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Fungal infection: पावसाच्या पाण्यामुळे बुरशीचा संसर्ग, या टीप्स वापरुन घ्या त्वचेची काळजी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल