TRENDING:

Gudhi Padwa : गुढी पाडव्यासाठी घरीच बनवा साखरेची गाठी! 'या' 2 पद्धतींनी अवघ्या 10 मिनिटांत होईल तयार..

Last Updated:

Gudhi padwa special sakhar gathi recipe : तुम्हाला शुद्ध आणि चांगल्या गाठी हव्या असतील तर आज आम्ही तुम्हाला या गाठी घरी कशा बनवायच्या हे सांगणार आहोत. साखरेच्या गाठी घरी बनवणं अगदी सोपं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गुढी पडावा आता जवळ आलाय. गुढी पाडव्याला सर्वात जास्त मान असतो तो हणजे, साखरेच्या पाठीला गुढी उभारल्यानंतर फुलांच्या माळेसोबत या साखरेच्या गाठींचीही माल लावण्याची पद्धत आहे. या गाठी बाजारातही सहज मिळतात. पण तुम्हाला शुद्ध आणि चांगल्या गाठी हव्या असतील तर आज आम्ही तुम्हाला या गाठी घरी कशा बनवायच्या हे सांगणार आहोत.
गुढी पाडवा स्पेशल साखर गाठी रेसिपी
गुढी पाडवा स्पेशल साखर गाठी रेसिपी
advertisement

साखरेच्या गाठी घरी बनवणं अगदी सोपं आहे. तुम्हाला यासाठी ना जास्त मेहनत घ्यावी लागते, ना जास्त वेळ घालवावा लागतो. शिवाय तुम्ही अगदी हायजिनिक पद्धतीने या गाठी बनवू शकता. या गाठींची ही रेसिपी annapurna_amruta या इंस्टाग्राम अकाऊंटवर दिली गेली आहे. चला तर मग पाहूया घरच्या घरी झटपट साखरेच्या गाठी कशा बनवायच्या.

advertisement

साखरेची गाठी बनवण्यासाठी लागणारं साहित्य..

- साखर

- पाणी

- दूध

- फ्रुट सॉल्ट

- वेलची पूड (आवडीनुसार)

साखरेची गाठी बनवण्याची सोपी पद्धत..

- सर्वात आधी गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवा.

- त्यानंतर या कढईमध्ये एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घाला

- आता हे मिश्रण शिजू द्या. पाक उकळतोय तोवर एक आप्पे पात्र घ्या.

advertisement

- आप्पे पात्राला तूप लावून व्यवस्थित ग्रीस करा.

- आता एका वाटीत पाणी घेऊन त्यात दोरा बुडवून घ्या.

- हा दोरा आता आप्पे पॅनच्या सर्व खान्यांमध्ये व्यवस्थित ठेवा.

- उकळलेल्या मिश्रणात आता 2 चमचे दूध घाला.

- त्यानंतर हे हलवा आणि वरती जो काळा माळीसारखा पदार्थ येईल तो हळूच काढून घ्या.

advertisement

- आता यामध्ये 1/4 चमचा फ्रुट सॉल्ट टाका आणि हे मिश्रण व्यवस्थित हलवा.

- आता पाकचा थोडा भाग घेऊन पाणी असलेल्या प्लेटमध्ये टाका.

- या पाकचा जर गोळा तर तयार झाला याचा अर्थ तुमचे मिश्रण तयार आहे.

- आता आप्पे पॅनमध्ये टाकलेल्या दोऱ्यावर हे मिश्रण थोडे थोडे टाका आणि थंड होऊ द्या.

advertisement

- थंड झाल्यावर या गाठी हळूच आप्पेपात्रामधून काढून घ्या.

तुम्ही आणखी एका पद्धतीने गाठी बनवू शकता. ते म्हणजे, एक ताट घ्या, त्याला तुपाने ग्रीस करा. त्यावरही पाण्यात बुडवलेला दोरा पसरवून ठेवा. त्यानंतर तयार मिश्रण या दोऱ्यावर थोड्या थोड्या प्रमाणात टाका. यालाही थंड झाल्यावर हलक्या हाताने काढून घ्या.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक चवीची अस्सल भेळ, पुण्यात एकाच ठिकाणी खा 3 प्रकार, किंमत 60 रुपये! Video
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Gudhi Padwa : गुढी पाडव्यासाठी घरीच बनवा साखरेची गाठी! 'या' 2 पद्धतींनी अवघ्या 10 मिनिटांत होईल तयार..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल