आपला बहुतेक वेळ कार्यालयात किंवा खुर्च्यांवर किंवा घरी बसून व्यतित करतो. यामुळे पाठीचा कणा, कंबर आणि पाठीच्या स्नायूंमध्ये ताण आणि वेदना जाणवणात. यासाठी, पश्चिमोत्तानासन हा शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे.
Eye Care : एपिफोरा म्हणजे काय ? एपिफोरा झाला तर कोणते उपाय करायचे ?
पश्चिमोत्तानासनाचे शरीराला अनेक फायदे आहेत. हे आसन हठयोगातील मूलभूत आसनांपैकी एक आहे. याला 'सीटेड फॉरवर्ड बेंड' असंही म्हटलं जातं. हा एक संस्कृत शब्द आहे; 'पश्चिमी' म्हणजे 'शरीराचा पाठीचा भाग', 'उत्तान' म्हणजे 'खोलवर ताण' किंवा तीव्र विस्तार आणि 'आसन' म्हणजे 'मुद्रा'. या आसनामुळे शरीराच्या पाठीला खोलवर ताण मिळतो.
advertisement
पश्चिमोत्तानासनाचे फायदे
हठयोग प्रदीपिकेनुसार, पश्चिमोत्तानासन 'सर्वोत्तम आसनांपैकी' एक आणि हठयोगाच्या बारा मूलभूत आसनांपैकी एक मानलं जातं. या आसनामुळे पाठीला आणि पायांना चांगला ताण मिळतो आणि पचनसंस्था मजबूत होते. शिवाय, यामुळे पोटावरील चरबी देखील कमी होते.
आयुष मंत्रालयाच्या मते, मधुमेह, सायटिका आणि लठ्ठपणासाठी पश्चिमोत्तानासन अत्यंत फायदेशीर योगासन आहे. हे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर आहे.
यामुळे पोटातील अवयवांना चालना मिळते, पाठीच्या कण्याची लवचिकता सुधारते आणि मानसिक ताण आणि चिंता कमी होण्यास मदत होते.
पश्चिमोत्तानासन करण्यापूर्वी त्याची योग्य पद्धत जाणून घेणं आवश्यक आहे. हे आसन करण्यासाठी, प्रथम जमिनीवर पाय सरळ आणि पसरवून बसा. मग, एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू शरीर पुढे वाकवा. शक्य तितकं हातांनी पायांना स्पर्श करा आणि डोके किंवा नाक गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न करा. ही स्थिती क्षणभर टिकवून ठेवा, आणि परत करा. योग्य मार्गदर्शनाखाली आसनं करणं चांगलं ठरेल.
