TRENDING:

Health Tips : पावसात सारख भिजताय का? मग या' टिप्स फॉलो करा, अन्यथा आजारी पडलाच म्हणून समजा

Last Updated:

Health Tips In Monsoon : पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप यांसारखे आजार पटकन होऊ शकतात. विशेषतहा पावसात भिजल्यानंतर काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते.चला तर मग आज जाणून घेऊ पावसात भिजल्यानंतर कोणते घरगुती उपाय करावेत ,ज्याने आरोग्य चांगले राहील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Health Care In The Rain : पावसाळ्यात भिजणे काहींना आनंददायी वाटत असले,. अचानक आलेल्या सरींमध्ये आपण नाईलाजाने भिजतो आणि त्यामुळे सर्दी-जुकाम, ताप, फ्लू किंवा इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे पावसात भिजल्यानंतर काही गोष्टी तात्काळ करणे गरजेचे असते. या छोट्या-छोट्या सवयी अंगीकारल्यास आजारपण टाळता येते आणि शरीर निरोगी राहते. चला तर जाणून घेऊ या पावसात भिजल्यानंतर कोणत्या चार महत्त्वाच्या काळज्या घ्याव्यात.
News18
News18
advertisement

1. ताबडतोब कपडे बदला

पावसात भिजल्यावर सर्वप्रथम ओले कपडे काढून कोरडे आणि उबदार कपडे घालणे अत्यंत आवश्यक आहे. ओले कपडे शरीराचे तापमान कमी करतात आणि त्यामुळे सर्दी-ताप हा आरोग्याच्या समस्या लवकर होऊ शकतात. कपडे बदलल्यानंतर शरीर व्यवस्थित पुसून घ्या. शक्य असल्यास गारठा कमी करण्यासाठी कोमट पाण्याने आंघोळ करावी. त्यामुळे शरीर ताजेतवाने होते, त्वचेवर असलेले जंतू नष्ट होतात आणि संसर्गाचा धोका कमी होतो.

advertisement

2. कोमट पाणी किंवा गरम पेय प्या

भिजल्यावर शरीराला आतून उब मिळणे आवश्यक असते. त्यामुळे हर्बल चहा, आलं-तुळशीचा काढा, किंवा कोमट पाणी पिणे फायदेशीर ठरते. अशा पेयांमुळे शरीराला उष्णता मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चहामध्ये मध घालून घेतल्यास घशातील खवखव दूर होते आणि सर्दीचाही त्रास कमी होतो. याउलट थंड पेये, कोल्ड ड्रिंक किंवा आइसक्रीम यांचा वापर टाळावा कारण त्यामुळे शरीर आणखी थंड होते आणि आजार पटकन बळावतात.

advertisement

3. इम्युनिटी वाढवणारा आहार घ्या

पावसाळ्यात भिजल्यानंतर शरीर कमकुवत होतं आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ताजे संत्री, लिंबू, आवळा यांसारख्या व्हिटॅमिन-सीने समृद्ध फळांचा आहारात समावेश करावा. हे पदार्थ शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतात आणि संसर्गाशी लढण्यास मदत करतात. याशिवाय गरम सूप, उदा. टोमॅटो सूप किंवा भाजीपाल्याचे सूप प्यायल्याने शरीर उबदार राहते आणि पोषणही मिळते. तसेच हळदीचे दूध प्यायल्यास सूज कमी होते आणि इम्युनिटी वाढते.

advertisement

4. पायांची काळजी घ्या

शरीर थंड होण्यामागे पायांचा मोठा वाटा असतो. पावसात भिजल्यावर पाय व्यवस्थित कोरडे करून मोजे घालावेत. शक्य असल्यास कोमट पाण्यात मीठ टाकून 10-15 मिनिटे पाय ठेवावेत. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, थकवा कमी होतो आणि थंडीचा परिणाम कमी होतो. हा उपाय विशेषतहा ऑफिसमधून किंवा प्रवास करून आल्यावर केल्यास खूप आराम मिळतो.(वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : पावसात सारख भिजताय का? मग या' टिप्स फॉलो करा, अन्यथा आजारी पडलाच म्हणून समजा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल